Breaking

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

कर्मयोगी गोविंद बापूंच्या आदर्श विचाराचा वारसा पतसंस्था पुढे चालवीत आहे,,,,, प्राध्यापक अर्जुनराव सरक





कर्मयोगी गोविंद बापूंच्या आदर्श  विचाराचा वारसा पतसंस्था पुढे चालवीत आहे,,,,, प्राध्यापक अर्जुनराव सरक 
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

कर्मयोगी गोविंद बापूंच्या आदर्शवत विचाराचा वारसा पतसंस्था पुढे चालवत आहे असे प्रतिपादन प्रा अर्जुन सरक प्रवक्ते यांनी केले.जेऊर ता. करमाळा येथील कर्मयोगी गोविंदबापू पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संजयकुमार गादिया होते तर व्यासपीठावर पाटील गटाचे मार्गदर्शक तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक,व्हॉईस चेअरमन मुबारक शेख,संचालक सुनील शहाणे, नवीन कुमार दोशी, कांबळे सर, शितलकुमार दोशी, अर्जुन पांढरे, संस्था सचिव अनिल पाटील,लोकनेते नारायण पाटील पतसंस्था सचिव विलास ठोकळ सर, माजी सरपंच भास्कर कांडेकर, सोसायटी अध्यक्ष महेश कांडेकर, माजी उपसरपंच धनाजी शिरस्कर, साडे येथील शेलार सर, करमाळा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था सचिव पांडुरंग वाघमारे सर, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस कर्मयोगी गोविंद बापू पाटील व मोतीकाका गादीया यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अहवाल वाचन व प्रास्तविक संस्था व्यवस्थापक शांताराम सुतार यांनी केले. यावेळी त्यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा सभासदां समोर मांडला.तर विलासराव ठोकळ यांनी पतसंस्था कशी चालवावी याबद्दल मार्गदर्शन केले चेअरमन संजय गादिया यांनी पतसंस्थेत ध कोटी हून अधिक ठेव असल्याचे सांगत पाच कोटी हून अधिक कर्जवाटप झाल्याचे सांगितले. तसेच पुढील आर्थिक वर्षात पतसंस्थेत पंधरा कोटी हून अधिक ठेव असेल व कर्जवाटप प्रमाण वाढवले जाईल. सभासदांना चांगला लाभांश व ठेवीदारांना चांगले व्याज देऊन छोट्या व्यावसायिकांना कमी व्याजदरात तात्काळ कर्ज देण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. यावेळी विलासराव ठोकळ, प्रा अर्जुनराव सरक, सुनील तळेकर यांनी विचार मांडले. सूत्रसंचलन अंगद पठाडे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष मुबारक शेख यांनी मानले. यावेळी उपस्थित सभासदातून पाच सभासदांना लकी ड्रॉ काढून उपस्थिती बद्दल आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सभासदांना सोलापुरी चादर भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक सोमनाथ वाघमोडे,कुलदीप जाधव, अतुल गदिया यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा