DJ विरहीत मिरवणुकीचा निर्धार करणाऱ्यांचा पोलिसांकडून सत्कार.....
श्रीगोंदा- नितीन रोही, तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील DJ विरहीत मिरवणुकीचा निर्धार करणाऱ्या व 'एक गाव एक गणपती विसर्जन मिरवणुकीचां निर्णय घेवून ढोल ताशा, पारंपारिक बँड, हलगी, टाळ मृदुंग अशा पारंपारिक वाद्यांवर मिरवणूक काढण्याचा निर्णय घेणाऱ्या व विसर्जन मिरवणुकीत महिलांना प्राधान्य देणाऱ्या १३ गणेश मंडळांचा बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार थोरात,बेलवंडी चे सरपंच ऋषीकेश शेलार ,मा. सरपंच उत्तम डाके, सोपान तात्या हिरवे यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला.
नायब तहसीलदार थोरात बोलताना म्हणाले की, बेलवंडी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून बेलवंडी गावाने डिजे विरहित पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असून जिल्ह्यात बेलवंडी हे पहिलेच गाव आदर्श असणार आहे.
सरपंच ऋषीकेश शेलार यांनी बोलताना सांगितले की, बेलवंडी गावाने एक गाव एक मिरवणूक ती पण डीजे विरहित मिरवणूक हा निर्णय राज्यामध्ये एकमेव असून याचा आदर्श संपूर्ण राज्यामध्ये असणार आहे.
माजी सरपंच सरस्वती डाके यांनी बोलताना सांगितले की, महिलांना या आधी मिरवणुकीचा आनंद घेता येत नव्हता पण आता डीजे विरहित पारंपरिक वाद्यात मिरवणुकीचा गावाने एकमुखाने निर्णय घेतल्याने गावातील व परिसरातील सर्व महिलांना यामध्ये सहभागी होऊन आंनद घेता येणार आहे.
यावेळी बेलवंडीतील शिवशंभो गणेश मंडळ,जयहिंद प्रतिष्ठाण,मोरया प्रतिष्ठाण,कानिफनाथ प्रतिष्ठाण, संघर्ष प्रतिष्ठाण, श्रीकृष्ण गणेश मंडळ, पिंपळगाव पिसा येथील हनुमान तरुण मंडळ, शिव आझाद तरुण मंडळ,देवगिरी बाबा तरुण मंडळ आणि एक गाव एक गणपती बसविल्याबद्दल चिंभळे, एरंडोली, हिंगणी,येळपणे येथील गणेश मंडळातील सदस्य व महिलांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरस्वती डाके, जयश्री शेलार, दरवडे,डॉ. वैशाली लगड,दत्ता जगताप, संदीप शेळके, बाळासाहेब ढवळे,मधुकर शेलार, सुनिल शिवणकर, सलीम शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सोसायटी चे चेअरमन सुखदेव लाढाणे, सोपान हिरवे, श्रीनाथ दूध संकलन केंद्राचे- बाळासाहेब लबडे,सुनिल ढवळे, युवराज पवार, स्वप्निल घोडेकर, अशोक शिंदे, पोलीस पाटील मिराताई शेलार, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी हभप बबन महाराज जगताप, हभप साळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी केले.सूत्रसंचालन केशव कातोरे यांनी केले तर आभार पो कॉ. हसन शेख यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा