पिलीव येथीलरखडलेल्या पूलाच्या कामासाठी प्रांताधिकारी यांना भेटणार;संग्रामसिंह जहागिरदार
पिलीव प्रतिनिधी-प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील म्हसवड -पंढरपूर या रस्त्यावरील ओघळीवर पूलाचे अर्धवट राहिलेले काम व मुख्य रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी लवकरच अकलूज येथील प्रांताधिकारी यांना भेटून काम लवकर सुरू करण्याची मागणी करून असे मत सहकार महर्षी साखर कारखान्याचे नूतन संचालक संग्रामसिंह जहागीरदार यांनी व्यक्त केले.
पिलीव येथील जामदार कुटुंबीयांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना संग्रामसिंह जहागीरदार म्हणाले यापूर्वी रस्त्याच्या कामाची अडचण व माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अकलूज विभागाच्या अभियंत्यांना विचारता येत होती परंतु आता या रोडवेज चे काम पुणे विभागिय आयुक्तांकडे असल्यामुळे त्यांच्याकडे समक्ष भेटून माहिती घेण्यास वेळेत जाता येत नाही. म्हणून म्हसवड पंढरपूर या रोडचे लवकरात लवकर काम सुरू होण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,आमदार राम सातपुते खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यामार्फत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मुख्य चौकात पावसाळ्यात चिखलाचा राडा होऊन दूर्घटना होत होती, तर इतर वेळी धुळीचा त्रास व लगतच्या विहिरीतून घाण पाण्याची दुर्गंधी पसरली असल्याने भयंकर त्रास होत असल्याने तेही काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.
यावेळी नूतन संचालक संग्रामसिंह जहागिरदार, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबूराव कदम,रतनसिंग रजपूत,हणमंत कोळी, डॉ.दत्तुराम लोखंडे, शिवाजीराव इंगळे,सौ सुषमा जामदार, रणधीरसिंह जामदार ,सदाशिव मदने, जयसिंह जहागिरदार, अरुणसिंग जामदार ,संस्कार जामदार,संजय जाधव,अरुण घोरपडे,तानाजी लोखंडे ,मोहसीन शेख ,संजय आर्वे ,अविनाश जेऊरकर ,दामोदर लोखंडे, प्रमोद भैस,प्रा.संजय पाटील,संतोष गुजरे ,संतोष सावळजकर आदि मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक संग्रामसिंह जहागीरदार यांचा सत्कार करताना मान्यवर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा