Breaking

मंगळवार, १६ मे, २०२३

विद्यमान सर्व संचालक मंडळाचे उमेदवारी अर्ज नामंजूर होणार. ?.....संतोष वाळूजकर




विद्यमान सर्व संचालक मंडळाचे उमेदवारी अर्ज नामंजूर होणार.....संतोष वाळूजकर


करमाळा प्रतिनिधी

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला साखर आयुक्तांनी विनापरवाना गाळप केल्याबद्दल सात कोटीचा दंड केला आहे कर्तव्यात कसूर केल्यामुळे हे सर्व संचालक मंडळाचे अर्ज नामंजूर होणार असून शिवाय या प्रत्येक संचालकाकडे विठ्ठल रुक्मिणी पतसंस्था श्रीगोंदा यांची थकबाकी आहे
व पॅनल प्रमुख दिग्विजय बागल व रश्मी बागल यांच्याकडे ब्रह्मदेव माने सहकारी बँकेची तसेच जनता सहकारी बँक उस्मानाबाद या दोन बँकेची कोट्यावधी रुपयाची थकबाकी आहे हे सर्व थकबाकीदार असल्यामुळे बहुतांश सर्व विद्यमान संचालकाचे उमेदवारी अर्ज नामंजूर होणार असा दावा बजरंग दलाचे संघटन मंत्री संतोष वाळुंजकर यांनी केला आहे

पत्रकारांशी बोलताना संतोष वाळूजकर म्हणाले की
सतत दोन वर्ष मकाई कारखान्याला गाळप परवाना शासनाने दिला नव्हता  ऊसाला योग्य दर नाही ऊस दिला तर पैसे वेळेवर नाहीत ऊस उत्पादक सभासद माकायला ऊस घालत नाही

आज मकाई कारखान्याकडे शेतकऱ्याचे तीस कोटी रुपये येणे बाकी आहे मात्र कारखान्यात एक किलो सुद्धा साखर शिल्लक नाही

यामुळे मकाई कारखान्याची निवडणूक सर्व ताकतीने आम्ही लढवणार असून आमच्या लढाईत प्राध्यापक रामदास झोळ ही झाली असून

निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली

मकाई कारखान्याची निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली असून कोणतीही माहिती सभासदाला देत नाहीत मकाई चे सर्व संचालक थकबाकीदार असताना संबंधित सहकारी संस्थांकडून दाखले निवडणूक निर्णय अधिकारी मागवत नाहीत कारखान्याला ऊस
दिलेल्या शेतकऱ्यांची यादी देत नाहीत
बाबत आम्ही सर्व तक्रारी सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केले असून वेळप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा