Breaking

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांची कारवाई.”



जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांची कारवाई.”
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

 

उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांचे पथक कळंब उप विभागातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 12.11.2022 रोजी गस्तीस होते. दरम्यान पथक येरमाळा पो.ठा. हद्दीतील वडजी शिवारात आले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, वडजी गाव शिवारात फॉरेस्ट च्या पाठीमागे माळरानावर एका पत्रा शेडमध्ये काही इसम तिरट जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणच्या शेडमध्ये 17.45 वा. सु. छापा टाकला असता तेथे 1. रवि पांडुरंग धोंबडे 2. शिवशंकर दिगंबर भातलवंडे 3. संजय निवृत्ती भातलवंडे, तीघे रा. दहिफळ, ता. कळंब 4. विशाल निवृत्ती जाधवर 5. रमजान शेख 6. अशोक नामदेव थोरात, तीघे रा. वडजी, ता. वाशी 7. सुरेश सुब्राव कुटे, रा. रामेश्वर, ता. भुम 8. समिर संजय आवटे, रा. जामगाव, ता. बार्शी हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. त्यांच्याकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर जुगाराचा अड्डा विशाल जाधवर हे चालवित असल्याचे समजले. नमूद जुगार अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह 01 मोटारसायकल, 03 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 1,69,570 ₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे ए.एस.पी.- श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. पुजरवाड, पोलीस अंमलदार- कऱ्हाळे, शेख, अंभोरे, खांडेकर, भांगे यांच्या पथकाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा