Breaking

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

चिंतामणी सुतार याची' महाराष्ट्र सुरक्षा बल'मधे निवडः। विमलेश्वर विद्यालयात हृद्य सत्कार ...



चिंतामणी सुतार याची' महाराष्ट्र सुरक्षा बल'मधे निवडः। विमलेश्वर विद्यालयात हृद्य सत्कार ...


बेंबळे। प्रतिनिधी।                

                  बेंबळे येथील चिंतामणी अधिकराव सुतार या युवकाची (एम्एस्एफ) 'महाराष्ट्र सुरक्षा बल' मधे निवड झालेली असून विमलेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तर्फे चिंतामणी याचा हृद्य सत्कार करण्यात आला, अध्यक्षस्थानी संचालक नागेश मस्के होते. चिंतामणी सुताऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेंबळे येथे झाले आहे, चिंतामणी हा इयत्ता दहावी नंतर सकाळी कॉलेज, दुपारी इतरत्र काम व सायंकाळी कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय करत होता व इतर वेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे .अतिशय नम्र, अज्ञाधारक व कष्टाळू स्वभावामुळे चिंतामणीने सर्वत्र आपलेपणा निर्माण केला आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रम तसेच सकारात्मक विचारसरणी असेल तर कठीण परिस्थितीवर मात करून जीवनात यशाची शिखरे जिंकता येतात याचे चिंतामणी हा आदर्श असुन  सर्वांना प्रेरणादायी ठरणारे उदाहरण आहे असे प्रशंसोद्गार  छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद भोसले यांनी सत्कारप्रसंगी काढले आहेत. यावेळी प्राचार्य अशोक बागवाले, प्रा. कोळेकर, प्रा. लोंढे आदी मान्यवरांनी चिंतामणीच्या यशाबद्दल कौतुक करून त्याला धन्यवाद दिले व त्याच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, ज्ञानेश्वर महाराज वाचनालयाचे सदस्य व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोहन भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कोळेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा