Breaking

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेभुर्णी चे आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत यश.



विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेभुर्णी चे आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत यश.


टेंभुर्णी प्रतिनिधी, /धनंजय भोसले

दि.12 व 13 नोव्हेंबर रोजी कुर्डुवाडी येथे पार पडलेल्या सोलापूर विद्यापीठअंतर्गत सोलापूर झोनल  आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे पै योगीराज नवनाथ टोणपे याने 67 किलो वजनगटामध्ये ग्रीक रोमन प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविला व त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरभारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली, श्रीधर कैलास पवार याने 61 किलो वजनगटामध्ये फ्रीस्टाईल प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळविला व सुचिता पांडुरंग लोकरे हिने 50 किलो वजनगटामध्ये तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले ,यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ रवींद्र कुनाळे यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार बबनरावजी शिंदे,अध्यक्ष मा.विक्रमसिंह शिंदे,सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मा. रणजितसिंह शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र कदम, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा