*टेंभुर्णी मध्ये शिव विचार प्रतिष्ठानचा दसरा मेळावा उत्साहात*
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा केला सन्मान
टेंभुर्णी (प्रतिनिधी) शिव विचार प्रतिष्ठान टेंभुर्णी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने टेंभुर्णी शहरामध्ये पहिल्या वर्धापनदिनानिमित्त दसरा मेळावा व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्यवरांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आ. संजय मामा शिंदे हे होते.
कार्यक्रमाची संयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खटके यांचे संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरच्या मेळाव्याचे प्रथम आयोजन करण्यात आले तरी सुद्धा नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला विशेष करून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले त्यामध्ये त्यांनी शिव विचार प्रतिष्ठान च्या वतीने आजवर केलेल्या कामाबद्दल सांगितले खास करुन प्रतिष्ठानतर्फे गड कोट ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन, व्यसनमुक्ती चे कार्य, सांप्रदायिक कार्य याचे विश्लेषण केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना जेष्ठ साहित्यिक डॉ महेंद्र कदम यांनी शिव विचार प्रतिष्ठानचे कार्याचे कौतुक केले पण दसरा व नवरात्र या हे सण साजरे करण्याच्या मागचे प्राचीन काळापासून चे महत्त्व सांगितले तसेच समाजाची जडण घडण होत असताना व्यसनमुक्ती किती गरजेची आहे हे त्यांनी सांगितले
समाजातील स्री चा सन्मान हा गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रणजित शिंदे यांनी प्रतिष्ठान च्या कार्याचा गौरव करीत शिंदे कुटुंबीय हे कायम या प्रतिष्ठान च्या माध्यमातून होणाऱ्या कार्यास मदत करतील असे सांगितले
यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना पुरस्कार प्रदान करण्यात आले, हे पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आ श्री संजय मामा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले जिजाऊ सामाजिक पुरस्कार डॉ सौ स्मिता पाटील मोहोळ यांना देण्यात आला,तर द करमाळा येथील वकील बाबुराव हिरडे यांना व्यसनमुक्ती प्रबोधन साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला, विठ्ठलराव कला महाविद्यालयाचे प्रा संजय साठे सर यांना साहित्यिक विषयक कार्या बद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच ऊस उत्पादनामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या बेंबळे येथील प्रगतशील बागायतदार श्री सोमनाथ हुलगे यांना त्यांच्याशेती विषयक कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर तांबवे चे माजी सरपंच बाळासाहेब माने याना व्यसनमुक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला,यावेळी उपस्थित मान्यवरांना शिवाजी कोण होता? हे गोविंद पानसरे यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुरस्कर्ते यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले, भैरवनाथ शुगर चे शेतकीआधिकारी विजय खटके , उपसरपंच नागेश बापू खटके पाटील, राजाभाऊ खटके पाटील ,तुकाराम ऊर्फ बंडू नाना ढवळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली
यावेळी उपस्थित .जि प सदस्य रणजित शिंदे, बंडूनाना ढवळे,रावसाहेब देशमुख,भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्ष माढा तालुका सौ .धनश्री खटके पाटील,सुधीर देशमुख, शिराळचे सरपंच बाळासाहेब ढेकणे,महेश कोठारी, पालवनचे सरपंच अतुल क्षीरसागर, परमेश्वर पाटील ,भारत साळुंखे पत्रकार संतोष वाघमारे सचिन होदाडे,माजी सोसायटी चेअरमन संतोष खटके,सोसायटी चेअरमन अशोक खटके,भाजनदास न खटके,अक्षय ढवळे,मधू खटके,गोरख खटके,बापू पाटील ,पै नितीन खटके,दादा कोल्हे,बेबंळे सो सा चेअरमन मनुआबा पवार, ग्रा प सदस्य डॉ भिमराव पवार,सोमनाथ काका कदम,राजकुमार बाबा धोत्रे,वेणेगावचे नेते राजाभाऊ शिंदे,सागर शिंदे,किरण कदम, घोटीचे पोलीस पाटील भागवत भोसले,सापटने चे अमोल ढवळे, दहिवलीच्या सरपंच कौसर तय्यब जहागीरदार सचिन नलावडे सोमनाथ नलवडे, कल्पेश लोकरे ,बलभीम लोंढे,रमेश देशमुख, अभिजीत दळवी,करकंब बार्डीचे पोलीस पाटील, पांडूतात्या ढवळे,हनुमंत ढवळे.,खटके नागेश बापू: मावळा ग्रुप कुर्डूवाडी च्या श्रीमती नीता खटके हे उपस्थित होते,यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिव विचार प्रतिष्ठानचे संस्थापकअध्यक्ष विजय खटके पाटील यांनी मानले
हा कार्यक्रम संयोजन गणेश व्यवाहारे,योगेश पराडे,गणेश शिंदे पोलीस, सागर खटके,पाटलूभाऊ खटके,नामदेव व्यवाहारे,सचिन तळेकर,डॉ अवध जाधव,मरगळ शेठ, व इतर सर्व युवक कार्यकर्ते यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा