विठ्ठलराव शिंदेच्या पिंपळनेर व करकंब येथील कारखान्यांचा मंगळवारी गळीत हंगाम शुभारंभ...
आ.बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी।
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर (ता.माढा) युनिट एक चा 22 वा गळीत हंगाम शुभारंभ व करकंब (ता.पंढरपूर) युनिट दोन चा चौथा गळीत हंगाम शुभारंभ मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे सकाळी 11 वाजता व दुपारी चार वाजता, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे शुभहस्ते , ह भ प जयवंत प्रभाकर बोधले महाराज (धामणगावकर) तालुका बार्शी यांचे अध्यक्षतेखाली तसेच करमाळा- माढाचे आमदार संजयमामा शिंदे व उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे.
या दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमास सभासद ,शेतकरी, अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, मॅनेजिंग डायरेक्टर संतोष डिग्रजे व जनरल मॅनेजर सुहास यादव यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा