Breaking

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

बाजार बंदीत गाई विकायची मग् फोटो अन् मोबाईल क्रमांक करा सेंड .बाजार बंदीत सोशल मिडीया ठरतोय बळीराजालाआधार


बाजार बंदीत गाई विकायची  मग् फोटो अन् मोबाईल क्रमांक करा सेंड .



बाजार बंदीत  सोशल मिडीया ठरतोय बळीराजालाआधार




परंडा (दत्ता नरुटे).पशुपालक व्यावसायावर लंपी आजाराची वक्रदृष्टी पडली आहे .त्यामुळे खरेदी विक्री व्यवहाराचे बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या गाईंची खरेदी विक्री पुन्हा कोंडीत सापडली आहे . मात्र पशुपालक युवकांनी यावर मात करण्यासाठी  सोशल मीडियाचा आधार घेत मोजक्या प्रमाणात खरेदी विक्रीचा नवा फंडा विकसीत केला आहे . विक्री करणाऱ्या गाईचे, म्हैस आदीचे  फोटो ,व्हिडिओ सोबत मालकाचा नंबर अशा गोष्टी वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर व फेसबुक वर  सेंड केल्या जात आहेत या माध्यमातून ग्राहक मिळत आहे सध्या सुरू असलेल्या बाजार बंदीत सोशल मीडिया शेतकऱ्यांचा आधार ठरत आहे .

                कृषी व्यवसायाच्या अर्थकारणाचा कणा ठरलेला पशुपालन व्यवसायावर कोरोना महामारीनंतर सध्या नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे  परंडा ,भूम तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून खरेदी विक्री बाबतीत आठवडी बाजारात ९०० ते हजार  जनावरांची खरेदी विक्री होते . या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल सुरू असते . मात्र सध्या लंपीच्या पाश्वभुमीवर बाजार व जनावरांची वाहतूक बंद करण्यात आली आहे . त्यामुळे अनेक शेतकरी जनावर खरेदी विक्री बंद असल्याने अडचणीत सापडले आहेत 


 खरेदी विक्रीची आवश्यकता


दुग्ध व्यावसायात गाईची खरेदी विक्री तेजीत सुरु होती . अनेक गाई विनेच्या जवळ असल्याने आशा गाईंची खरेदी विक्री करणे पशुपालकांना गरजेचे असते . विक्री न झाल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते .त्यामुळे अशा गाईंची विक्रीला सोशल मीडियातून मोठा प्रतिसाद  मिळत आहे .  


जनावरांच्या सुरक्षेसाठी बाजार बंद ठेवले आहेत . पण यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे लसिकरण जलद करूण नियम अटी टाकुण बाजार लवकर सुरु होणे गरजेचे आहे .

 दादा पाडुळे 
चेरमन  ध्रुव दूध संकलन आवार पिंपरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा