शिंदे यांची पुढची पिढी सामाजिक वसा पुढे चालवत आहे - शरदचंद्रजी पवार
कन्हेरगांव /प्रतिनिधी धनंजय मोरे
पंचायत समिती कुर्डूवाडी च्या प्रांगणामध्ये पंचायत समितीचे पहिले सभापती व माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार सुरेश शहा लिखित बबनदादा शिंदे आमदारकीचा दस्तऐवज या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाची माहिती प्रा.राजेंद्र दास यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सामाजिक विशेष न्याय मंत्री धनंजय मुंडे हे होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार म्हणाले की माढ्याचे मा. आमदार व कुर्डूवाडी पंचायत समितीचे पहिले सभापती यांचा पूर्णाकृती पुतळा कुर्डूवाडी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रांगणात अनावरण होते, यामुळे मला बरे वाटले. माझ्या सार्वजनिक जीवनाच्या प्रारंभी पूर्वीची प्रभावशाली जी जुनी माणसं होती, त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे हे एक शेती व सहकाऱ्यांच्या मार्गाने या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची त्यांची भूमिका होती. समाधानाची गोष्ट म्हणजे त्यांची पुढची पिढी ही सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवीत आहे. आमदार बबनदादा शिंदे म्हणजे सहहदवी, विनम्र कृतीशीलता, नम्रता, लोकांसाठी सतत कष्ट घेणारे, शेतकऱ्यांसाठी जिवाचे रान करणारे, व्यक्तिमत्व म्हणजे माढा तालुक्यासाठी ही सर्वात मोठी देणगी आहे. मी पहिल्यापासून बबन दादांना पहात आहे. दादांची मागणी म्हणजे स्वतःचा स्वार्थ कधीच नसतो. ते नेहमी तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच मंत्रालयामध्ये अजित दादांना व सर्व टीमला सतत भेटत असतात. विकासासाठी निधी मागत असतात. बबन दादा म्हणजे विकासाने पछाडलेली एक व्यक्तिमत्त्वच आहे.
यावेळी आमदार बबनराव शिंदे , आमदार संजयमामा शिंदे , आमदार अरुण लाड , माजी आमदार विनायक पाटील , जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे , सभापती विक्रमसिंह शिंदे , पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे , बारामती ऍग्रो कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष आबा गुळवे , पंढरपूर चे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील , कल्याण काळे , दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे , जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात आमदार संजयमामा शिंदे यांनी पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.भाऊनी केलेल्या कार्याची माहिती दिली. भाऊ दोन वेळा पंचायत समितीचे पहिले सभापती होते. 1972 मध्ये ते विधानसभा सदस्य झाले त्यांचे निधन 1976 मध्ये झाले. शिंदे कुटुंबांना पवार साहेबांनी पहिल्यापासून भरभरून काही दिले. त्यामुळे माढा तालुका सुजलाम सुफलाम बनवता आला. मा. आमदार विनायकराव पाटील मनाले की मी 1970 सालापासून सभापती विठ्ठलराव शिंदे यांच्याबरोबर होतो. ते अतिशय शिस्तबद्ध कडक स्वभावाचे होते. एखाद्या कार्यकर्त्यांनी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थोडासा फ्रॉड केला असेल तरी त्यांना ते चालत नव्हते. परंतु माझ्यावर त्यांचा फार मोठा विश्वास होता. त्यांचे चेकबुक सह्या केलेला नेहमी तो माझ्यासोबत असे एवढा विश्वास त्यांचा माझ्यावर होता.
माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की सन 1995 पासून ते आज पर्यंत माढा तालुक्यामध्ये तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी साहेबांचा फार मोठा सहभाग मिळाला आहे. साहेबांनी तालुक्यासाठी भरपूर दिले आहे. त्यांनी आमच्या शिंदे कुटुंब्यावर फार मोठा विश्वास टाकला आहे. माढा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचे वीज कलेक्शन वीजबिला वाचून आज पर्यंत कोणालाही कट करू दिले नाही. 2004 साली एका भाषणाच्या वेळी दादांनी तालुक्याचे आदलाबदल करण्याची भाषा केली होती.याचा यावेळी आवर्जून उल्लेख केला. त्यावेळेस बारामती तालुका आम्हाला द्या व आमचा माढा तालुका तुम्हाला घ्या असे दादा पवार साहेबांना बोलले होते. परंतु आता ती परिस्थिती तशी राहिली नाही. कारण हेच वाक्य ऐकून शरदचंद्रजी पवार साहेबांनी माढा तालुक्यावर विशेष लक्ष देऊन तालुक्याचे नंदनवन केले. 1972 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कै यशवंतराव चव्हाण यांनी उजनीचे भूमिपूजन केले होते. पहिल्यापासून भाऊ बद्दल बोलताना शिंदे कुटुंब आणि त्यानंतरच्या दोन पिढ्या याच्यातले अंतर सांगताना पवार साहेबांनी केलेल्या आजपर्यंतच्या कार्याची जाणीव करून दिली. तेव्हा ते भाऊ झाले होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते.
यावेळी राज्याची मा. सामाजिक विशेष न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की जसा कारखानदारी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादनातील राज्य घडले आहे. त्याप्रमाणे देशांमध्ये एकट्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाने 25 लाख टन ऊस गाळप करून एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. त्याचप्रमाणे कुर्डूवाडी पंचायत समिती स्थापन झाल्यापासून एकांदा दुसरा अपवाद वगळता सभापती पद हे शिंदे कुटुंबाच्या घरातच आहे. हे सुद्धा माझ्या मते देशातील रेकॉर्डच आहे. ह्या विक्रमाचे खरे मानकरी शिंदे कुटुंबावर प्रेम करणारे पवार साहेब हे आहे. पवार साहेब हे देशातील गोरगरीब जनतेचे व सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्यांचे आहेत. ज्यावेळी भाजप सरकार पूर्वी फक्त एका मताने संसदेमध्ये कोसळले तेव्हा त्यांची जी भाषा होती ती भाषा आता महाराष्ट्रात नाही. कारण चांगले सरकार चालू असलेले महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सरकार पाडण्याचे पाप हे भाजपनेच केले आहे. कारण सत्ता पायउतार केव्हा होते. राज्यामध्ये आणीबाणी असेल, राज्यामधील लोकांना खायला मिळत नसेल अगदी खूपच कटिंग असा प्रकार असेल आर्थिक दृष्ट्या मागासलेला असेल तेव्हा हे चित्र बदललेले असते. परंतु महाविकास आघाडीच्या काळामध्ये चांगले सरकार चालत होतं.आत्ताचे सरकार चालत आहे का? त्यावर बोलताना मुंडे म्हणाले की 20 जून सुरत, नंतर गुवाहाटी, नंतर गोवा आणि मग एक महिन्यांनी महाराष्ट्रात. दोन जणांना शपथ घेण्यासाठी एक महिने, 18 जणांना शपथ घेण्यासाठी 42 दिवस आणि आत्ता तरी पालकमंत्र्याचा पत्ताच नाही, अशी दयनीय अवस्था महाराष्ट्राची झाली आहे. तेव्हा महाराष्ट्राचा काय विकास घडणार असे ते म्हणाले. यावेळी सर्वच अपक्ष आमदार हे सरकार सोडून निघून गेले, परंतु करमाळा तालुक्याचे एकमेव अपक्ष आमदार ते म्हणजे संजय मामा शिंदे हे ठामपणे साहेबांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे दादा मामांची जोडी ही नक्कीच भविष्यामध्ये जनतेसाठी आवरष्ट कष्ट घेणारी आहे हे सिद्ध झाले आहे आणि होणारही आहे.
यावेळी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांचे आभार जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजीत सिंह शिंदे यांनी मानले.
चौकट
धनंजय मुंडे साहेब बोलताना जनतेला म्हणाले की महाविकास आघाडी सरकार का पडले? तेव्हा जनतेतून एकच आवाज आला की आधी बोके, मग खोके आणि नंतर सर्व काही ओके. यावर स्टेजवर एकच हशा पिकला. यावेळी आमदार बबनदादा शिंदे शेवटी भाऊक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावरही ते म्हणाले की मी थोडं स्तब्ध झालो. मला प्रश्न पडला की हे अश्रू कशाचे? परंतु हे अश्रू उद्या भाऊंची पुण्यतिथी आहे त्यांच्या आठवणीतले अश्रू? त्यात दुःखाचे किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे आणि शरद पवार साहेबांचे शिंदे कुटुंबावर असलेल्या प्रेमाचे आहेत याची मला खात्री पटली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा