Breaking

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब युनिट मधून 27 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार...... आगामी वर्षात कारखान्यात बायोगॅस प्रकल्पाची उभारणी.. .. दीड लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा दुसरा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार.. ...कामगारांना ८.३३ टक्के बोनस ... आ. बबनदादा शिंदे



विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब  युनिट मधून 27 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार....



.. आगामी वर्षात कारखान्यात बायोगॅस प्रकल्पाची उभारणी..
 .. दीड लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा दुसरा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार..
 ...कामगारांना ८.३३ टक्के बोनस  ... 
                                    आ. बबनदादा शिंदे


 बेंबळे। प्रतिनिधी।   मुकुंद रामदासी बेंबळे प्रतिनिधी 

***************************************

            आगामी सन 20 22- 20 23 हंगामात विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोन मधून 27 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येणार असून आगामी वर्षात या कारखान्यामध्ये सी एन जी बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे व तसेच  दीड लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन दुसरा इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प आगामी चार महिन्याचे आत कार्यान्वित करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे  कामगारांना ८.३३ टक्के बोनस देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.


                  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरून आमदार बबनदादा शिंदे बोलत होते, व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे कार्यकारी संचालक संतोष डीग्रजे जनरल मॅनेजर सुहास यादव यांचे सह मान्यवर संचालक व्यासपीठावर उपस्थित होते. 
      स्वर्गीय विठ्ठल भाऊंच्या प्रतिमा पूजनानंतर कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी गत आर्थिक वर्षातील अहवाल वाचन केले, सर्व ठरावांना सभासदांनी आवाजी मंजुरी दिली .


अधिक माहिती सांगताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की 20 21- 20 22 हंगामात विठ्ठलराव शिंदे च्या पिंपळनेर व करकंब युनिट मधून 30 लाख मेट्रिक टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे, डिस्टिलरी प्रकल्पातील उच्चांकी उत्पादन, उच्चांकी ऊस गाळप व विशेष वीज निर्मिती केल्याबद्दल कारखान्यास राष्ट्रीय व प्रादेशिक पारितोषिकांनी गौरवण्यात आलेले आहे ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असून आत्तापर्यंत च्या मागील 22 वर्षात विठ्ठलराव शिंदे कारखान्यास 26 प्रादेशिक व राष्ट्रीय पारितोषिकाने यापूर्वी गौरवण्यात आले आहे. साखर निर्यात ,इथेनॉल निर्मिती व वीजनिर्मिती यामुळे कारखान्यास चांगले पैसे मिळाले म्हणून उसाला प्रति टन 2604 रुपये शेतकऱ्यांना दर देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत तसेच एप्रिल व मे मध्ये उशिरा गाळप झालेल्या उसालाही शंभर रुपये व दोनशे रुपये प्रति टन जादा दर दिलेला असून एफ आर पी  पेक्षा हे पैसे शेतकऱ्यांना जादा मिळालेले आहेत. आगामी धोरणाविषयी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की सध्या कारखान्यात दीड लाख लिटर इथेनॉल प्रतिदिन निर्मिती होत आहे व आता नवीन दीड लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प येत्या नोव्हेंबर पासून कार्यान्वित होणार आहे, त्यामुळे पुढील काळात प्रत्येक दिवशी तीन लाख लिटर इथेनॉल निर्माण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आगामी वर्षात  कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या स्पेंट वॉश व प्रेसमड् यापासून सीएनजी बायोगॅस  निर्मितीचा प्रकल्प  उभारण्यात येणार असून शासना पेक्षा कमी दराने  हा गॅस शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहे.  कामगारांना पगार वाढ पूर्वीच केलेली आहे तसेच या वर्षात ८.३३ टक्के बोनस देण्यात येणार असून दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल., तसेच सर्व प्रकारचे शासकीय फंड्स कारखान्याने दिलेले असून कारखान्यातर्फे पूर्वीप्रमाणे सामाजिक उपक्रम चालूच राहणार आहेत.
    या कार्यक्रमास संचालक पोपट गायकवाड रमेश येवले- पाटील प्रभाकर कुटे अनिल वीर बापू डोके सुरेश  बागल पोपट चव्हाण अमोल चव्हाण सचिन देशमुख वेताळ अण्णा जाधव ,घाडगे ,मोरे ,लक्ष्मण खुपसे ,नागटिळक, विष्णू हुंबे, कृषी उत्पन्न चे संचालक दिलीपराव भोसले तसेच विभाग प्रमुख सर्वश्री संभाजी थीटे पोपटराव येल्पले पांडुरंग थोरात दिलीप लवटे पांडुरंग बागल अविनाश ढेकणे सुनील बंडगर अंकुश लगड दत्ताजी देसाई सुनील शिंदे संजय केचे  शशिकांत पवार आदी मान्यवरासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार संचालक वेताळ आण्णा जाधव यांनी मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा