Breaking

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न



बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न 




 
कन्हेरगाव(प्रतिनिधी)
           १५ ऑगस्ट रोजी अकोले (खुर्द) येथील मा . बबनरावजी शिंदे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले (खुर्द) येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७५ वा वर्धापन दिन व ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात पार पडला . या कार्यक्रम प्रसंगी  प्रगतशील बागायतदार मा . नानासाहेब नवले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले तर प्रमुख पाहुणेपद प्रशालेचा माजी विद्यार्थी गणेश येताळा पाटील ( P . S . I मुंबई ) यांनी तसेच 
अकोले (खुर्द) चे सरपंच रुपालीताई नवले , सरपंच प्रतिनिधी कांतिलाल नवले , उपसरपंच कुबेर महाडिक , विनोद पाटील सर , माजी संचालक संतोष पाटील , माजी सैनिक ज्ञानदेव चोपडे , माजी सरपंच महादेव घाडगे भाऊसाहेब ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी बबनराव पाटील , पंडित पाटील , गणेश भांगे , पंडित नाना पाटील , सुधाकर नवले , पोलीस पाटील नागेश पाटील ,अरुण बापू पाटील अशोक आबा पाटील माजी सरपंच किसन घाडगे ,राम काका घाडगे ,उपसरपंच सिद्धेश्वर हांडे माजी ग्रामपंचायत सदस्य भारत नवले सर ,कृष्णराज नवले ग्रामपंचायत सदस्य नागनाथ अण्णा पाटील ,सचिन भैय्या पाटील मान्यवर प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते .
           यावेळी प्रतिमा पूजन प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी PSI गणेश येताळा पाटील यांचे हस्ते व इतर प्रतिष्ठित मान्यवरांनी केले तर ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .नानासाहेब नवले यांनी माजी सैनिक ज्ञानदेव चोपडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . तसेच १३ ऑगस्ट रोजी माजी सैनिक चोपडे मेजर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते .
              ध्वजारोहण प्रसंगी प्रशालेचा विद्यार्थी हार्मोनियम वादक प्रतिक गणेश चिंतामण यांच्या साथीने विद्यार्थिनींनी ईशस्तवन राष्ट्रगीत , झेंडा गीत गायन केले तर विद्यार्थिनी तेजश्री पाटील हिने संविधान वाचन केले .
देशासाठी शहीदांना तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , उद्योग , संगित , कला - क्रीडा इ .क्षेत्रातील व्यक्ती ज्यामुळे त्या त्या क्षेत्रात ज्यांच्या निधनाने फार मोठी पोकळी निर्माण झाली तसेच प्रशालेतील काही विद्यार्थी , पालक यांच्या निधनाने शाळा दुःखी झाली यांना या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पन करयासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले .
प्रास्ताविक मनोगतातून प्रशालेचे प्राचार्य तथा संस्थेचे सचिव  राजेंद्र ठोंबरे सर यांनी शालेय गुणवत्ता आढावा घेतला , विद्यार्थी संख्यावाढ झाल्याने भौतिक सुविधेवर येणारा ताण व त्यावर उपाययोजने संदर्भात बसेसची संख्या १३ झाल्याचे सांगतानाच दूर दूरच्या गावातून विद्यार्थी या ठिकाणी येत असून संख्या वाढतच असल्याचे सांगितले . "पूर्वीच्या काळी असणारी कमी विद्यार्थी संख्या व भौतिक सुविधा व सद्या वाढतच असणारी विद्यार्थी संख्या २५०० वर पोहचली असताना भौतिक सुविधेमध्ये कमतरता जाणवत असेल तर विद्यार्थी व पालकांनी सांभाळून घ्यावे परंतु गुणवत्तेत कमी पडणार नाही . " असे आवाहन करून अश्वासन दिले . तसेच पुढील काळात नावीण्य पूर्ण उपक्रम राबवून स्पर्धा परीक्षा , सेट , नेट , निट , जी .ई तसेच पोलीस , आर्मी हत्यादी साठी तयारी करण्यासाठी सेमिनार व अध्यापन यातून विद्यार्थी घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगतानाच ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे तसेच लक्ष्य दिल्यामुळेच शाळा आज उच्च पदाला व नावलौकीकास पात्र ठरल्याचे सांगितले .
अध्यक्ष यांचे वतीने प्रमुख पाहुणे PSI गणेश पाटील माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील जुण्या आठवणींना उजाळा दिला . शिक्षकांच्या कठोर शिस्तीमुळेच आम्ही घडलो . तसेच मा . प्राचार्य यांच्या गुणवत्तेला प्राधान्य या प्रशासनामुळेच प्रशालेची प्रगती झाल्याचे सांगितले तसेच देशातील महान नेत्यांची घोषवाक्य सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
सोनाक्षी यादव ,श्रद्धा कुटे , ऋतुजा येळे या मुलींनी ओजस्वी शैलीत देशभक्तीपर भाषणे केली .
या प्रसंगी माजी सैनिक ज्ञानदेव चोपडे ,ॲड. रणजित पाटील , माजी सरपंच घाडगे भाऊसाहेब , संभाजी पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त केली .
या प्रसंगी प्रशालेचा माजी विद्यार्थी रामेश्वर कुंभार यांचा  चित्रकार व रांगोळीकार उत्कृष्ट कामगिरी बद्दल कांतिलाल नाना नवले यांचे तर्फे मा प्राचार्य ठोंबरे सर यांचे हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले .
संस्थेचे अध्यक्ष आमदार मा . संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपळवाटेचे मा उद्धव माळी यांनी मामांचा प्रिंटफोटो असलेल्या १०० वह्या प्रशालेतील गरीब विद्यार्थ्यांना देण्यासाठी भेट दिल्या . तसेच माझी विद्यार्थी P SI ( मुंबई ) यांनी ६००० रुपयाची पुस्तके ग्रंथालयास भेट दिली . यांचे प्रशालेचे प्राचार्य यांनी मान्यवरांच्या इस्ते स्वीकार केला .
शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम झाला . यातून देशभक्तीपर लहान गट वंदे मातरम थीम डान्स ५ वी ते ७ वीच्या मुलींनी , जलवा थीम डान्स मोठ्या गटातील ८ वी ते १० वी च्या मुलांनी सादर केला . तसेच तेरी मिट्टी मे मिलजावा , ओ देश मेरे तेरे ईशारेपे सजके अशी दोन गीत डान्स ही प्रशालेतील मुलींनी सादर केला .
रोटरी क्लब टेंभुर्णी आयोजित देशप्रेम समूह डान्स स्पधेत मोठ्या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला . व चित्रकला मोठ्या गटात प्रथम क्रमांक
अस्मिता लोकरे हिन पटकावला .द्वितीय क्रमांक राजकुमारी नवले  हिने पटकावला .मयुरी कुबेर हिने चौथा क्रमांक पटकावला  तर चित्रकला स्पर्धेत लहान गटात
ऋतुजा येळे हिने प्रथम क्रमांक पटकावला .  वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात श्रद्धा कुटे हिने तृतीय क्रमांक पटकावला .  
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जलवा थीम डान्स मधील द्वितीय क्रमांक प्राप्तमुली तसेच मोठा गट चित्रकला स्पर्धा प्रथम , द्वितीय व चतुर्थ क्रमांक पटकावल्या बद्दल तसेच  लहान गट प्रथम क्रमांक व वक्तृत्व स्पर्धा लहान गटात तृतीय क्रमांक पटकावल्या बद्दल यशस्वी मुलींचे अभिनंदन करण्यासाठी बक्षीस वितरण प्रसंगी टेंभुर्णी रोटरी क्लब कार्यक्रमास स्वतःउपस्थित राहून प्रशालेचे प्राचार्य यांनी अभिनंदन करून कौतुक केले . सर्वच विद्यार्थिनींनी या उत्सवात उत्तम डान्स करून १५ ऑगस्ट २०२२ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न केला .
या कार्यक्रमास अकोले (खुर्द) व पंचक्रोशीतून ग्रामस्थ , विद्यार्थी पालक , प्रतिष्ठित नागरिक , माजी विद्यार्थी , विद्यार्थी , शिक्षक - शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .प्रास्ताविक संस्थेचे सचिव तथा  प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर यांनी सूत्रसंचालन  एस .बी .कोळी सर यांनी केले तर आभार दिनेश डोके यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा