Breaking

सोमवार, ११ जुलै, २०२२

देशी खिलार गाय वाचली पाहीजे.


देशी खिलार गाय वाचली पाहीजे.


वडूज प्रतिनिधी / शरद कदम


          महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा होत असताना बळीराज्याचं राज्य आता संपुष्टात आले आहे. देशी गोवंश नामशेष होत चालला असून त्यांच्या जागी विदेशी संकरित गाईनी अतिक्रमण केले आहे. देशी खिलार गाईपेक्षा शेतकरी संकरीत गाईलाच जास्त महत्व देऊ लागला आहे. देशी गाईपासून शेतकऱ्यांना अनेक फायदे आहेत ते संकरीत गाईपासून मिळत नाहीत. त्यामुळे देशी खिलार गाय कत्तलखान्यापासून वाचली पाहिजे. देशी गाई पासून पंचगव्य तयार करताना देशी गाईचे दूध, तूप, ताक, दही, गोमूत्र आणि शेण याचा वापर करतात. आयुर्वेदात देशी गाईला फार महत्त्व आहे. ज्या ठिकाणी देशी गाईची सेवा केली जाते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतोच शिवाय  वातावरण ही प्रसन्न राहते. देशीगाईच्या शरीरातून बाहेर पडणारी  ऊर्जा परिसरात सुलभ वातावरण बनवते. देशी गाईच्या पाठीवर असणारी सूर्यनाडी ही तिच्या वशिंदात सूर्यकिरण शोषून घेऊन  त्या सुर्यनाडीच्या माध्यमातून त्वचा, दूध, गोमूत्र आणि शेण यांच्यात  रूपांतरित केली जाते. देशी गाईचे गोमूत्र प्राशन केल्याने अनेक विकार बरे होतात म्हणून पंचगव्यला महत्व प्राप्त झाले आहे. देशी गाईला चालता फिरता दवाखाना म्हणतात  त्यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबात एक देशी गाय असणे गरजेचे आहे. गाईच्या पाठीवरून मानेपासून शेपटापर्यंत हात फिरवत राहिल्यास साधारण वीस मिनिटात रक्तदाब साधारण होऊ शकतो. देशी गाईच्या कपाळावर असणारा उंचवटा ह तिच्या मेंदूचा रिमोट कंट्रोल मानला जातो. साधारण जनावरांच्या प्रजातीमध्ये खिलार गाय हुशार आणि चपळ मानली जाते. देशी गाईच्या दुधामुळे बालके हुशार  आणि चपळ होतात. देशी गाईच्या दह्यात आम्लांश प्रमाण मापात असल्यामुळे शरीरातील आमलपित्त कमी होण्यास मदत होते. दुधात कमी स्निग्धता आणि ग्लुकोज फ्राक्टोजचे प्रमाण नियमित असल्यामुळे दूध  शीत उष्णतेवर तापवून त्याची साई  भाजलेल्या ठिकाणी लावल्यास  भाजलेल्या जागेवर पांढरे व्रण उठत नाहीत. तुपाच्या वापरामुळे मूळव्याध आणि त्यास निगडित आजार  कायमचे बरे होतात. जर गोमूत्राचा   फवारा घरात आणि परिसरात दिल्यास उपद्रवी सूक्ष्मजीव नाहीसे होतात. सेंद्रिय शेतीचा गोमूत्र शेण दही ताक याचा वापर करून स्लरी तयार करून त्याचा भाजीपाला पिकावर फवारणी दिल्यास दर्जेदार उत्पन्न मिळण्यास मदतच होते. अस्थिव्यंग किंवा मणक्याच्या त्रास  यावर गाईच्या तुपात कापूर मिसळून  हलके मालिश केल्यास ते हाडापर्यंत शोषले जाऊन आराम मिळतो. मानसिक विषमता रुग्ण देशी गाई कडे काही वेळ एकाग्र पाहत राहिल्यास मानसिक संतुलनासाठी  हा उपाय खात्रीशीर आहे. गाईचे शेण  कितीही दिवस एका जागेवर राहिले तरी त्यात किडे होत नाहीत. सेंद्रिय शेतीला गाईच्या शेण खतामुळे उच्च प्रतीची उत्पादने मिळण्यास मदत होते.
           सध्या बैलगाडा शर्यत सुरू झालेमुळे पुन्हा देशी गोवंश वाढू लागला असला तरी देशी खिलार गाय वाचली पाहीजे. काही जागृत संघटना  यांच्यामुळे कत्तलखान्यात  जाणाऱ्या गाईचे जीव वाचले आहेत. आषाढ महिन्यात बेंदूर सण साजरा करताना गाईची आणि बैलांची पूजा करून सवाद्य मिरवणूक काढणारा बळीराजा आजचा बेंदूर सण आनंदाने साजरा करत आहे.


  चौकट

 कोरोनाच्या संकटकाळात कोरोना ड्युटी करून घरी आल्यावर देशी खिलार गाईचे १ लिटर गोमूत्र १० लिटर पाण्यात टाकून त्याने आंघोळ केल्यामुळे कोरोना रुग्णांच्या सानिध्यात कर्तव्य बजावून ही कोरोनाला बळी पडलो नाही असे हुतात्मा हायस्कूलचे शिक्षक प्रा राजेंद्र जगदाळे यांनी सांगितले. 
फोटो 

पिंगळी बुद्रुक - येथील शिवलीला गोशाळेतील १२ लिटर दूध देणारी राणी देशी खिलार गाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा