सालसे येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीची लातूर येथे आत्महत्या
करमाळा प्रतिनिधी
सालसे येथे हिवरे रोड वस्तीवर राहत असणाऱ्या व सध्या लातूर येथे शिक्षणासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सालसे गावात एकच खळबळ उडाली आहे सदरची विद्यार्थिनी ही गौंडरे येथील एका विद्यालयातील शिक्षकाची मुलगी असून ती सध्या लातूर येथे बारावीच्या वर्गात महाविद्यालयीन शिक्षण घेत होती सदर विद्यार्थिनीने लातूर येथेच आत्महत्या केल्याने सालसे गावात खळबळ उडाली आहे
आज पहाटे करमाळा शहरातील एका मुख्याध्यापकांनी पोफळज रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यानंतर आज मुख्याध्यापका पाठोपाठ एका विद्यार्थिनींनी लातूर येथे आत्महत्या केल्याने शैक्षणिक क्षेत्रात भलतीच खळबळ माजली आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा