Breaking

सोमवार, ११ जुलै, २०२२

शिक्षक किशोर भागवत यांची पोपळज रेल्वे रुळावर आत्महत्या शिक्षक वर्गात मात्र खळबळ




शिक्षक किशोर भागवत यांची पोपळज रेल्वे रुळावर आत्महत्या शिक्षक वर्गात मात्र खळबळ


जेऊर प्रतिनिधि

 करमाळा शहरातील नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक किशोर अनंत भागवत (वय – ४८) यांनी पोफळज (ता.करमाळा) येथील रेल्वे रूळावर आत्महत्या केली आहे  भागवत यांनी आत्महत्या केल्याने करमाळा शहरातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार आज (ता.११) पहाटे अडीचच्या सुमारास घडला आहे. भागवत यांच्या खिशातील एटीएम कार्ड व मोबाईलवरून त्यांची ओळख पटली आहे. किशोर भागवत करमाळा नगरपरिषदे नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पत्नी माया भागवत या सिताबाई परदेशी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. भागवत यांनी मोटारसायकल बाजूला लावून रेल्वेरूळावर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यात जोराच्या धडकेत त्यांचा चेहरा उध्वस्त झाला असून पाय तुटलेला आहे. त्यामुळे त्यांना ओळखणे तसे कठीण गेले परंतू जवळील वस्तूवरून त्यांची ओळख पटली आहे. ही घटना करमाळा शहरात कळताच एकच खळबळ उडाली आहे. भागवत यांना पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. श्री भागवत यांच्या मृत्यूमुळे आज नगरपालिकेतील शाळांना सुट्टी देण्यात आली होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा