करमाळा शहर व तालुकामध्ये ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद उत्साहमय वातावरणात साजरी--
करमाळा प्रतिनिधी
- करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .करमाळा शहर काझी यांनी हजरत इब्राहिम (अ.) आणी हजरत ईस्माईल(अ.)ने इस्लामसाठी दिलेल्या कुर्बानीचे महत्त्व सांगीतले.
याशिवाय करमाळा मशिदी मध्ये देखील मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त नमाज अदा करून ईद साजरी केली यावेळी करमाळा शहरातील मक्का मशीद येथे मौलाना सिकंदर शेख, जामा मशीद येथे हाफिज अन्वर शेख, नूरानी मशीद येथे मौलाना मर गुबूल हसन, तसेच अर्फान मशीद येथे मौलाना हाफिज इकराम, आयशा मशीद येथे मौलाना सय्यद अली, मदिना मशीद येथील मौलाना वाजिद मिल्ली तर मुस्लिम मोहल्ला येथील मशीद मध्ये अबू रेहान मौलाना यांनी नमाज पठण करून बकरी ईद चे महत्व सांगितले
याशिवाय करमाळा तालुक्यातील जेऊर, कंदर, केम, उमरड, झरे, आवाटी, सालसे, हिसरे, पारेवाडी आदी भागात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साह वातावरणात साजरी केली यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता
चौकट घेणे
मुस्लिम बांधवांचा पवित्र असा बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही महत्त्वाचे सण एकाच दिवशी आल्याने शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयाबद्दल मुस्लिम बांधवांचे सर्व स्तरातून जोरदार अभिनंदन होत आहे हिंदू मुस्लिम भाई भाई असा एकोपाचा संदेश देत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी केली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा