Breaking

सोमवार, ११ जुलै, २०२२

सातबारा उता-यावर मोबाईल क्रमांकासह ई- मेलची नोंदणी-तहसिलदार कुलथे,


सातबारा उता-यावर मोबाईल क्रमांकासह ई- मेलची नोंदणी-तहसिलदार  कुलथे,


श्रीगोंदा-नितीन रोही,

महसूल विभागातील ई- फेरफार प्रकल्पाच्या आता खातेधारकांच्या सातबारा उता-यावर मोबाईल क्रमांकासह ई- मेलची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी माहिती संकलीत करायचे काम सुरू असून खातेधाराकांनी वैयक्तीक संपर्काची माहिती तलाठी कार्यालयात सादर करावी, असे अहवान तहसीलदार मिलींद कुलथे यांनी केले आहे.

शासनाने ई-फेरफार प्रकल्पात जमीन मालकांची वैयक्तीक माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. सातबारा उता-यावरील खातेदारांना त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. खातेदारांची प्राप्त झालेली माहिती तपासून झाल्यावर तलाठी डेटाबेसमध्ये साठविणर आहेत. यामुळे व्यवहाराच्या माहितीमध्ये बदल करून परस्पर व्यवहार करणे, बोगस कागदपत्रे सादर करून सातबारा उता-यावर नावे लावणे, बोजा चढविणे, वारस नोंद लावणे आदी जमीन व्यवहारची माहिती खातेदारांच्या सातबारा लिंक असलेल्यासंपर्क क्रमांकावर मिळेल. यातून फसवणूकीला आळा बसणार आहे. याचबरोबर बँक खाते माहितीच्या आधारे शेतपिकांची नुकसान भरपाई थेट बँक खात्यावर तात्काळ देण्यास सुलभता येणार आहे. जमीनमालक खातेधारकांनी गावाचे नाव, खातेदाराचे नाव, गट नंबर, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी (ऐच्छीक), बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड, आदी माहिती आपल्या गावातील तलाठी यांचेकडे जमा करावी. असे आवाहन तहसिलदार मिलींद कुलथे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा