शेजारच्या गावात कॉलेज होतंय मग कातरखटावला का नाही ? - मकरंद बोडके
कात्रेश्वर हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
कातरखटाव हायस्कूल, शाळांमध्ये गुणवतेचे शिक्षण दिले जाते. पण कातरखटाव हायस्कूलमध्ये कॉलेजची सुविधा नसल्यामुळे बारा खेड्यापाड्यातील पालकांना इतरत्र बाहेरगावी मुलांना पाठवावे लागत आहे. त्यासाठी सर्व पालकांनी मनावर घेतलं तर कॉलेजला मान्यता मिळेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मकरंद बोडके यांनी केले.
कात्रेश्वर हायस्कूल मध्ये दहावीमध्ये पहिला नंबर काढलेली कातरखटावची कन्या वैभवी क्षीरसागर हिला 94.60% दुसरा क्रमांक पार्थ पानस्कर याला 93 % तर तृतीय क्रमांक अथर्व बागल याला 92% गुण मिळाले. या गुणवंत विधार्थ्यांचा हायस्कूल व ग्रामस्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आजमितीला शाळांच्या विकासासाठी स्थानिक पालकांचे _सहकार्य महत्वाचे असून शाळांमध्ये सोयी - सुविधा अकरावी, बारावीचे वर्ग सुरु झाल्यास भागातील विध्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
सध्या तसं पाहिलं तर एनकूळ पेक्षा कातरखटावची लोकसंख्या जास्त आहे. कातरखटावला पंधरा खेड्यापाडयांच्या लोंकांचे दळणवळण, ये - जा चालू असून रोज बाजारपेठेत रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. गेली काही वर्षांपासून कात्रेश्वर हायस्कूल भागातील दहावीचे परीक्षा केंद्र आहे. तरीसुद्धा अकरावी, बारावी वर्ग का जोडले जात नाहीत? स्थानिक ग्रामस्थांचे, पालकांचे सोयी - सुविधेच्या बाबतीत आपल्या शाळांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मकरंद बोडके, अंकुश शिंगाडे, दस्तगीर डांगे, मुख्याध्यापक मधुकर जाधव, सर्व शिक्षक, विध्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
फोटो -
कातरखटाव - कात्रेश्वर हायस्कूल येथे गुणवंत विधार्थ्यांचा सत्कारप्रसंगी मकरंद बोडके व इतर मान्यवर.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा