Breaking

मंगळवार, ५ जुलै, २०२२

चव्हाणवाडी (टें) गावातील डाळिंबाचे हेक्‍टरी 22 लाखाचे उत्पन्न काढल्याने . धनंजय सलगर, यांचा केला सत्कार



चव्हाणवाडी (टें) गावातील डाळिंबाचे हेक्‍टरी 22 लाखाचे उत्पन्न काढल्याने . धनंजय सलगर, यांचा केला सत्कार


टेंभुर्णी प्रतिनिधी /aj24taas News Network


चव्हाणवाडी येथील नोकरी बरोबर शेतीकडे लक्ष देऊन ेक्‍टरी 22 लाख रुपयांचे डाळींबाचे उत्पन्न काढल्याने चव्हाणवाडी ग्रामपंचायत वतीने केला सत्कार 


चव्हाणवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एक हेक्टर डाळिंब लावून त्या डाळिंबाचे एक्स्पोर्ट क्वालिटीचे १५ टन अधिक १० टन असे एकूण २५ टन उत्पादन म्हणजेच साधारणपणे २१ ते २२ लाख रुपयांचे उत्पादन एक हेक्टर (अडीच एकर) क्षेत्रामध्ये काढून इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी टेंभुर्णी परिसरात उत्तम उदाहरण घालून दिल्याबद्दल ग्रामपंचायत चव्हाणवाडी (टें) तर्फे  धनंजय गोरख सलगर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार गावाचे सरपंच  सुनील मिस्कीन व ग्रामसेवक . संजय साळुंखे यांचे हस्ते करण्यात आला. 

प्रयोगशील शेतकऱ्याने ठरवले तर किती उत्कृष्ट शेती करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण तुम्ही घालून दिलेले आहे. एक  हेक्टर म्हणजेच साधारण अडीच एकर क्षेत्रामध्ये दुसऱ्याच हंगामात एक्स्पोर्ट क्वालिटीचे उत्पादन काढले आहे. अगदी प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या शेतामध्ये तुमचेसारखे स्तुत्य व अनुकरणीय प्रयोग करावेत व यशस्वीपणे राबवावेत अशीच भावना आपली डाळिंबाची शेती पाहिल्यानंतर येते. शेतीमधील असलेले तुमचे सखोल ज्ञान व प्रगत शेतीची महत्वाकांक्षा पावलोपावली दिसून आली. 
मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मध्ये उत्कृष्ट व तत्पर सेवा बजावत असताना सुद्धा आपण उर्वरित वेळेत स्वतः जातीने लक्ष देवून स्वतः कष्ट करून तसेच काटेकोर नियोजन व अथक परिश्रमातून उत्कृष्ट पद्धतीने डाळिंबाची शेती केलेली आहे व त्यातून प्रगत शेतीचा एक नवा वस्तुपाठ निर्माण केलेला आहे. सलगर यांचा आदर्श गावातील तसेच पंचक्रोशीतील इतर शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान चव्हाणवाडी चे सरपंच सुनील मिस्कीन यांनी सत्कार वेळी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा