कृषि विभाग पंचायत समिती किनवटच्या वतीने कृषिदिनी विविध उपक्रमांचे आयोजन
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना; विहीर जलपुजन, विहीर पुनर्भरण, बांधावर फळबाग लागवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेनुसार हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती 'कृषि दिन' निमित्त
कृषि विभाग पंचायत समितीच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानुषंगाने तालुक्यातील लहान घोटी येथे सुनिता किशन कुमरे या आदिवासी महिला शेतकरी यांच्या शेतात जिल्हा परिषदे अंतर्गत बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत दिलेल्या सिंचन विहीरीचे जलपुजन, विहीर पुनर्भरण, बांधावर फळबाग लागवड कार्यक्रम सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांचे हस्ते संपन्न झाला.
यावेळी नांदेडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी रेखा काळम-पाटील,पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, माजी उपसभापती कपिल करेवाड, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने , जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे सांख्यिकी अधिकारी सुधीर सोनवणे , हदगावचे बाल विकास प्रकल्पाधिकारी उमेश मुदखेडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, पंचायत समितीचे कृषि अधिकारी शिवराम मुंडे, सिकंदर पठाण, अभियंता सचिन येरेकर, उत्तम कानिंदे आदिच्या हस्ते बांधावर फणस, सिताफळ, करवंद व इतर फळबाग वृक्षांची लागवड केली.
या प्रसंगी ग्रामसेवक अंभोरे , तलाठी पांढरे , मुख्याध्यापक जगदीश कोमरवार यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा