नंदकुमार ताडे, संतोष शिंदे,समीर काझी यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी.
श्रीगोंदा-नितीन रोही,
शिवसेना माजी तालुका संघटक नंदकुमार ताडे, शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख संतोष शिंदे व माजी उपशहर प्रमुख समीर काझी यांनी सातत्याने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने या तिघांची शिवसेना पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर आणि जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी शिवसेना पक्षाकडून प्रसिद्धीसाठी दिली आहे.
हे लोक अनेक वर्षापासून शिवसेनेची फसवणूक करीत आहेत. शिवसेनेचे कुंकू लावून, भगवा पंचा गळ्यात टाकून विरोधी पक्षाला कायम हात मिळवणी करून स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना पक्षाचा वापर या लोकांकडून होत आहे असे वरिष्ठांच्या निदर्शनात आले आहे.
महाराष्ट्रातील जनता उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असताना, स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणारे नंदकुमार ताडे व संतोष शिंदे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीगोंदा शहरातील चौका-चौकामध्ये फटाके वाजून आनंद व्यक्त केला होता.
अशा गद्दारांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेनेची गट बाजी संपली असून आमच्या सर्व शिवसैनिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
अशी माहिती तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे यांनी दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा