Breaking

बुधवार, १३ जुलै, २०२२

वाचन संस्कृतिचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांना गोष्टीच्या पुस्तकांचे वितरण :उपक्रम.


वाचन संस्कृतिचे जतन करण्यासाठी 
विद्यार्थ्यांना गोष्टीच्या पुस्तकांचे वितरण :उपक्रम.




लातूर / ज्ञानेश्वर सूर्यवंशी: लातूर शहरात असलेल्या खाडगाव रोडवरील यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन लातूर या शाळेचा अहवाल सादरिकरणात प्रथम आला.शिक्षक आमदार विक्रम काळे साहेबांनी पहिले बक्षीस म्हणून 356 मराठी भाषेतील गोष्टीची पुस्तके यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन ला दिली.रजिस्टर मध्ये पुस्तकांची नोंद केली.विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती समृद्ध व्हावी व वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तके वितरण प्रमुख पाहुण्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सय्यद सलीमाच्य हस्ते  करण्यात आले. दोन वर्षा पासून कोरोना होता.विद्यार्थ्यांना लिहता वाचता येत नव्हते.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची गोडी लागेल.मराठी भाषा टिकली तरच आपली संसकृती टिकेल,वाचाल तर वाचाल या उक्ती प्रमाणे विद्यार्थ्यांच्या जिवनात ज्ञानाचा दिवा सतत तेजोमय व्हावा या उद्देशाने  शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेबांनी शाळेला गोष्टीची पुस्तके  दिली.
  यावेळी माध्य.विभाग प्रमुख लालासाहेब शिंदे,ग्रंथालयाचे प्रमुख महादेव कांबळे,सुधाकर होळंबे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा