ओला दुष्काळ जाहीर करा-संभाजी ब्रिगेड
हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : मागील आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे, यावर्षी वेळेवर पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या,पण अचानक गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.संततधार पावसामुळे काही भागातील पिके नष्ट झाली आहेत.तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाला करायला लावावेत व शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा.अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयास ई-मेल द्वारे पाठविण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा