छोट्यांमुळे आले गणपती मळ्याला पंढरीचे स्वरूप....
श्रीगोंदा-प्रतिनिधी
शहरातील मांडवगण रोडवरील गणपती मळ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेहेत्रे वस्ती च्या विद्यार्थी विध्यार्थीनींनी आषाढी एकादशी निमित्ताने पारंपरिक पद्धतीने वेश-भूषा करून संपूर्ण गणपती मळ्यातून विठ्ठल-रुक्मिणी चे नामस्मरण करीत पायी दिंडी काढली.त्यामुळे संपूर्ण मळ्याला पंढरपूर सारखे गर्दी चे स्वरूप आले होते. मळ्यातील नागरिकांनी या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हातात टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेऊन पायी दिंडीत सहभागी झाले होते.शेवटी गणपती मंदिरात बाप्पा चे दर्शन घेऊन दिंडीचा समारोप करण्यात आला.
या साठी मुख्याध्यापिका श्रीम.मीनाक्षी वाळुंज,श्रीम.माधवी गांगर्डे , श्रीकांत शिंदे सर,सौ.अनिता दांडेकर यांनी परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित गोरखभाऊ दांडेकर,नगरसेविका सुनीता खेतमाळीस,सौ.मिराताई खेतमाळीस,रुग्णसेवक नितीन रोही,सुदाम दांडेकर,आनंदा दांडेकर, धनंजय दांडेकर, संदीप पोकळे,नंदनवन चे पोपट आळेकर,
सौ. रोहिणी खेतमाळीस, अशोकराव खेतमाळीस, प्रशांत खेतमाळीस, रमेश दांडेकर, सौ.अश्विनी मेहेत्रे,प्रकाश कुदळे, संतोष पोकळे,मेजर अमित दांडेकर, महेंद्र दांडेकर, दिलीप गाडे यांच्या सह पालकवर्ग आणि
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य
उपस्थित होते.
चौकट-दिंडीसाठी भोजन व्यवस्था श्री.कांतीलाल पांडुरंग दांडेकर यांनी केली.
फोटो


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा