aj24taas network करमाळा प्रतिनिधी/अलिम शेख मो 9850686360
टेंभुर्णी ,करमाळा येथे देह विक्रीचा व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला तीन संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा व मोहोळ ते टेंभुर्णी रोडवरील लॉज मध्ये देहविक्रीचा व्यवसाय करून घेतल्याप्रकणी करमाळा पोलिसात तीन संशयित आरोपीविरुद्ध बुधवारी (ता. १३) गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापुर) येथील पीडितेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे याचा तपास करत आहेत.
याप्रकरणात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 4, 5, 6 सह 344, 324, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पिडीतेकडून नोव्हेंबर २०२१ पासून मुलीला विकुन दावण्याची धमकी देवून फिर्यादी पीडितेकडुन जबरदस्तीने टेंभुर्णी ते मोहोळ रोडवरील एका लॉज मध्ये व करमाळा येथील एकाच्या राहते घरी व वेगवेगळ्या पुरुष ग्राहकांकडुन एक हजार, दीड हजार व दोन हजार असे घेवून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला आहे. त्यातून त्यांनी सुमारे चार लाख रुपये कमावलेले आहेत. यामध्ये त्यांनी फिर्यादीला कंडोमचे पाकीट पुरविले, जेवण खाऊ घालुन राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना पीडितेने मोबदला माघितला म्हणून नेहमी धमक्या दिल्या. तिला मारहाण करून जखम केले. यामध्ये गुन्हा दाखल झालेले दोन संशयित आरोपी टेंभुर्णी येथील तर एकजण करमाळा येथील आहे. यामध्ये पीडितेला संशयित आरोपींनी हाताने, नी लाथाबुक्याने व लाकडाने मारहाण करुन डांबुन ठेवुन जबरदस्तीने देहविक्री करायला लावले, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा