दोन्ही युनिटमध्ये एकूण 32 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट .....आमदार बबनदादा शिंदे
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या दोन्ही युनिटचे मील रोलर पुजन संपन्न
बेंबळे।प्रतीनीधी ....मुकुंद रामदासी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.चे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या युनिटच्या पुढील गाळप हंगाम 2022-23 ची पुर्वतयारी सुरू असून दोन्ही युनिटचे मील रोलर चे पुजन संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सदर प्रसंगी अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने मागील सन 2021-22 गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 पिंपळनेर येथे 24 लाख 78 हजार 922 मे.टन व युनिट नं.2 करकंब येथे 6 लाख 55 हजार 564 मे.टन गाळप केलेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून 31 लाख 34 हजार मे.टनाचे देशामध्ये विक्रमी गाळप केलेले आहे.
पुढील गाळप हंगाम 2022-23 मध्येही ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने युनिट नं.1 पिंपळनेर येथे 25 लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ठ असून 34 हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. तसेच युनिट नं.2 करकंब येथे 7 लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ठ असून 8 हजार 500 हेक्टर उस क्षेत्राची नोंद झालेली आहे.
ऊस गाळप हंगाम 2022-23 मध्ये गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होण्याचे दृष्टीने दोन्ही युनिटकडे आवश्यक ऊस तोडणी वाहतूकीचे करार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच करार करणेत आलेल्या ट्रक/ट्रॅक्टर्स,बैलगाडी व ट्रॅक्टर टायरगाडीचे यंत्रणेस कारखाना धोरणाप्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा करण्यात आलेला आहे. ऑफ सिझन मधील सर्व कामे प्रगतीपथावर असून ऑफ सिझनमधील सर्व कामे वेळेत पूर्ण करून गाळप हंगाम 2022-23 शासनाचे धोरणानुसार सुरू करण्याचे दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संचालक सुरेश बागल, लाला मोरे, पांडूरंग घाडगे,कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव, जनरल मॅनेजर(प्रोसेस) पी.एस.येलपले, वर्क्स मॅनेजर ए.डी.ढेकाने,फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे, केन मॅनेजर एस.पी.थिटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, चिफ इंजिनिअर एस.डी. कैचे, चिफ केमिस्ट ए.के.जगताप, सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे, परचेस ऑफिसर जे.डी.देवडकर,युनिट नं.2 चे चिफ इंजिनिअर एस.एस.महामुनी, चिफ केमिस्ट बी.जे. साळुंखे, शेतकी अधिकारी बी.डी.इंगोले, अनिल वीर व इतर मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा