Breaking

गुरुवार, १४ जुलै, २०२२

आमच्या कंपनीतला माल पळवून स्वतःची दुकनदारी थाटलेल्या बागलांनी जनतेच्या विकासाचा पुळका आणु नये...जयवंतराव जगताप



आमच्या कंपनीतला माल पळवून स्वतःची दुकनदारी थाटलेल्या बागलांनी जनतेच्या विकासाचा पुळका आणु नये...जयवंतराव जगताप 

करमाळा (प्रतिनिधी)
बागल गटाचा नेमका कोणता विचार शहरातील मतदारांच्या घराघरात पोहचवायचा हे बागल गटाने अस्पष्ट सांगण्यपेक्षा  स्पष्ट सांगुन टाकावे असा उपरोधिक टोला माजी आमदार व जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांनी दिला आहे. 

         नुकतेच मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी करमाळा नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्याने आपल्या कार्यकर्तशी बोलताना बागल गटाचे विचार घराघरात पोहचवा अशा सुचना दिल्या आहेत त्याबाबत बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप दैनिक सुराज्यशी बोलत होते.    

   ते पुढे बोलताना म्हणाले की, नेमका  यापैकी  कोणता विचार कार्र्यकर्त्यांनी  घराघरात पोहचवायचा, भुलथापा, स्वप्नाळू व भावनिक भाषणे करून, विरोधी गटातील माणसे फोडून त्यांचा तेवढ्याचवेळेच्या निवडणुकीपुरता वापर करणे, आयत्या संस्था बळकावणे, ज्यांनी बोटाला धरून मोठ केल त्यांनाच गोठवण्याचा कसा प्रयत्न करण, लोकांना आपण केलेल्या भ्रष्ट कारभराचा विसर पाडण, आदिनाथ-मकाई साखर कारखाने कसे तोट्यात आणले, जगताप गट,मोहीते गट, भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना नंतर पुढे काय असेल हे नक्की नाही, असे राजकारण करायचा,  यातून नेमका कोणता विचार शहरातील मतदारांच्या घराघरात पोहचवायचा दिग्विजय बागल सांगुन टाका म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना ते बीज लावणे सोपे जाईल. कारण नेमक त्यांनाही माहीत नाही तुमच्या मनात कोणता विचार आहे. 

       आज असे अनेक गावपुढरी, शहरातील जगताप गटाचे शिलेदार यांना तेवढपुरते

 आपलेसे करून आपल्या गटात घेतले व नंतर त्यांची साधी विचारपूस तर सोडाच पण कोणत्यही राजकीय सत्तेत त्यांना कुठे सामावून घेतल्याचे आठवत नाही, आमच्या कंपनीतला माल पळवून नेऊन त्यांनी त्यांची दुकानदारी थाटली आहे ही वस्तुस्थित आहे हे कोणीही नाकारणार नाही. तालुक्याच्या व शहराच्या विकासात तुमचे किती योगदान आहे हे जनतेला माहीत आहे, तुम्ही किती विकासप्रीय व जनहितवादी आहात ते कारखान्यांच्या कारभारातून सर्वांनी पाहीले आहे, नका उगाच उसने अवसान आणून विकास आम्ही करू अशा खोट्या वल्गना नका करू,  आता ही जनता तुमच्य कोणत्यही आपलेपणाच्या भाषणबाजीला फसणार नाही, ये पब्लिक है सब जानती है!असा उपरोधिक टोला देवून जयवंतराव जगताप पुढे म्हणाले,जगताप गटच खरा जनतेचा गट असून, जगताप गटाशिवाय कोणालाही नगर परिषदेत जनता सत्ता देणार नाही हा जनतेचा ठाम निर्धार व माझा ठाम विश्वास आहे. आजपर्यंत जनतेने दिलेली नगर परिषदेची सत्ता आम्ही चागली राबवली,  आदिनाथसारखी आम्ही डबघाईल आणून बाजूला थांबलो नाहीत याचीही आठवण शेवटी जयवंतराव जगताप यांनी करून दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा