महाराष्ट्रातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम रद्द् व आचार संहिता संपुष्टात
करमाळा प्रतिनिधि
महाराष्ट्र निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्यातील 92 नगर परिषदा व 4 नगरपंचायती च्या सार्वत्रिक निवडणूक घेण्याचा आदेश 8 जुलै 2022 रोजी देण्यात आले होते ती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केला असल्याचे पञकान्वये जाहीर केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे ,सातारा, सांगली ,सोलापूर, कोल्हापूर ,नाशिक ,धुळे, नंदुरबार, जळगाव अहमदनगर, औरंगाबाद ,जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर ,अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र च्या वतीने एक परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत की राज्यातील वरील जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती च्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 8 जुलै रोजी जाहीर केला होता आणि त्या अनुषंगाने आचारसंहिता ही लागू झाली होती मात्र माननीय सर्वोच्च न्यायालय यात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756 / 2021 चे सुनावणी दिनांक 12 जुलै 2022 रोजी झाले त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल माननीय सर्वोच्च न्यायालय यात सादर केला आणि सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात पुढील सुनावणी दिनांक 19 जुलै 2022 रोजी ठेवली आहे सदर या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आयोगाने दिनांक 8 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेल्या राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित प्रत्यक्ष कार्यक्रम 2022 या द्वारे स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रकाद्वारे कळवले असून जाहीर झालेली आचारसंहिता आहे संपुष्टात आली असल्याचे या पत्रकात म्हटले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा