Breaking

बुधवार, १३ जुलै, २०२२

न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर 3 मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!



न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर 3 मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी! 




     रयत शिक्षण संस्थेच्या वांगी नंबर 3 शाखेमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरु पौर्णिमेचा म्हणजेच गुरु विषयी आदर व्यक्त करण्याचा आणि गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा या निमित्ताने प्रशालेतील इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी व वर्गशिक्षक एम. आय. पवार यांनी कार्यक्रमाचे सुंदर  आणि  देखणे आयोजन केले होते. 
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस सर्व पाहुण्यांच्या व शिक्षकांच्या शुभहस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याकार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुयांचा सन्मान यावेळी करण्यात आला यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते पेन आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. 
   या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील एकूण 42 विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यामध्ये 30 मुली आणि 12 मुले यांचा समावेश होता .विद्यार्थ्यांनी याप्रसंगी गुरूंविषयी आदराची भावना व्यक्त केली,तसेच गुरुची महती व्यक्त केली .आणि गुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे असे मत व्यक्त करून आम्ही नेहमी गुरूंचा सन्मान करू असा भाव व्यक्त केला. 
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्य महादेव आबा रोकडे हे होते तर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे स्कूल कमिटी सदस्य दिनकर तात्या रोकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
   याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे, महादेव पवार ,अतुल खूपसे ,विश्वनाथ सुरवसे संदीप मोटे, होनपारखे सर आणि सौ .होनपारखे मॅडम ,अमरदीप वारे या सर्वांचा सन्मान इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी केला. 
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता शिंदे, साक्षी निंबाळकर आणि धनश्री भुतकर यांनी अतिशय सुंदर रीतीने केले .तर आभार प्रदर्शन प्राची भंडारे हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा