Breaking

शुक्रवार, २७ मे, २०२२

आज्जीच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून पाच गावांना भजन किट वाटप*



*आज्जीच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून पाच गावांना भजन किट वाटप*


टेंभुर्णी प्रतिनिधी-
माढा तालुक्यातील कन्हेंरगाव येथे असणाऱ्या कै.गंगुबाई अंकुश डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त माढा तालुक्यातील पाच गावांना भजन किट वाटप करण्यात आले.
 कै.गंगुबाई अंकुश डोके कन्हेंरगाव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील कीर्तनकार निवृत्ती महाराज यांना बोलावण्यात आले होते.त्यांनी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कीर्तन सांगितले यावेळी कीर्तन ऐकण्यासाठी कन्हेंरगाव पंचक्रोशीतील अनेक महिला नागरिक उपस्थित होते तर याच कार्यक्रमाचे औचित्य साधून माढा तालुक्यातील भजन मंडळींना बोलवण्यात आले होते. दुपारी बारा वाजता कै.गंगुबाई डोके यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेवर पुष्पहार वाहण्यात आली यावेळी जमलेल्या माढा तालुक्यातील भजनी मंडळ यांना कै.गंगुबाई डोके यांचा नातू बापू महिपती कदम यांनी ग्रामीण भागात समाज प्रबोधन व्हावे म्हणून इतर खर्च टाळून माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील भजनी मंडळाला एक पेटी एक पकवाज एक विना 5 टाळ असे निमगाव (टें) सातोली भजनी मंडळ, लगोर्णी भजनी मंडळ, कन्हेंरगाव भजनी मंडळ भजनी मंडळ, शेवरे येथील शेतकरी वारकरी भजनी मंडळ आशा पाच भजनी मंडळांना भजन किट देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा