Breaking

बुधवार, २३ मार्च, २०२२

पुरंदर तालुक्यातील नायगाव (पुरंदर) येथे महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धा सन्मान सोहळा व होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न*


*पुरंदर तालुक्यातील नायगाव (पुरंदर) येथे महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धा सन्मान सोहळा व होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न*



पुरंदर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना काळात काम करणाऱ्यांचा ट्राफी, शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्यसेवा पुरविताना  अनेकांना मोठी कसरत करावी लागली. कोरोनापासून बचाव होण्यासाठी घरोघर तपासणी असो किंवा कोरोना बाधितांना खासगी व शासकीय रुग्णालयात सुविधा मिळवून देण्यात अनेकांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यासाठी सर्वांनीच ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य केले.आशा प्रकारे चांगले काम करणाऱ्यांचा नायगाव ग्रामपंचायतच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना युद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायपुरंदर तालुक्यातील नायगाव (पुरंदर) येथे महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धा सन्मान सोहळा व होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न*
तच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू,सिने अभिनेता सचिन सावंत यांचा होम मोनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला.सचिन सावंत यांचे सनई,ताशा वाजवून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यासाठी सरपंच बाळासाहेब कड यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पैठणी, उपसरपंच दत्तात्रय दरेकर यांच्या वतीने द्वितीय क्रमांकासाठी मिक्सर,सदस्य हरिदास खेसे यांच्या वतीने तृतीय क्रमांकासाठी डिनर सेट,सदस्य सुभाष चौंडकर यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकासाठी पंखा, सदस्या मनीषा कड यांच्या वतीने पाचव्या क्रमांकासाठी कुकर आशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.प्रथम क्रमांकाचे बक्षीस   जोस्ना खळदकर यांना मिळाले,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस संध्या खळदकर यांना मिळाले,तृतीय क्रमांकाचे बक्षीस ज्योती कड यांना मिळाले,चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस सुनिता कड यांना मिळाले,पाचव्या क्रमांकाचे बक्षीस सुरेखा कड यांना मिळाले.कोरोना योद्धा यासाठी डॉ अविनाश जाधव,डॉ राहुल चौंडकर,डॉ मधुरा कड,   तलाठी सुनिता वणवे,समुदाय आरोग्य अधिकारी अश्विनी थोरात, ग्रामसेवक अमित टिळेकर,सरपंच रोहन मुळीक,महादेव बोरावके,बाळासाहेब कोलते,उध्दव भगत,सुप्रिया चव्हाण,उपसरपंच सुरज गदादे,सागर चव्हाण,डी बी भिसे,संतोष जाधव,सचिन चौधरी,द्वारका गायकवाड,भारती इटकर,पल्लवी भागवत,कल्पना भागवत,साक्षी कड 
बारामती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अतुल ढम, निलेश पानसरे ,सागर चांदगुडे 
आदींचा करोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी स्पीकर व्यवस्था ग्रामपंचायत सदस्या भारती चौंडकर,निलोफर सय्यद यांनी केली.सत्कार व्यवस्था सदस्या आशा खेसे,शिवांजली पाटोळे,ग्रामसेवक अमित टिळेकर यांनी केली.यासाठी आदिनाथ भागवत,जयसिंग कड,आरती भागवत यांचे सहकार्य मिळाले.यावेळी
अतुल ढम, निलेश पानसरे ,सागर चांदगुडे बारीकराव खेसे,विलास खेस,रोहिदास कड,सदाशिव खेसे,संजय होले, बापू कोलते, सुनिल कोलते,मच्छिंद्र गायकवाड, अर्चना गायकवाड ,राजेंद्र मोदक,राजेंद्र भोसले,जयराम खेसे,चांगदेव चौंडकर,दिलीप फडतरे,किशोर खळदकर,नारायण चौंडकर,रामदास कड,संतोष गायकवाड,संदिप खेसे,संदिप ठवाळ,महेंद्र खेसे,गोविंद खेसे, सय्यद,चंद्रकांत चौंडकर, रियाज सय्यद,मंगेश चौंडकर,गणेश खळदकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा