राष्ट्रीय महामार्ग टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-कुसळंब या रस्त्याचे चौपदरीकरण होणार... -आ.बबनराव शिंदे आ.बबनराव शिंदे व आ.संजयमामा शिंदे यांनी अधिवेशनात मांडली लक्षवेधी सुचना.....
बेंबळे।प्रतीनीधी।
सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी राज्य मार्गाची दर्जोन्नती करुन राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर केलेले आहे. त्यामध्ये म्हसवड-अकलुज-टेंभुर्णी-बार्शी-कुसळंब या 73 कि.मी. च्या मार्गास राष्ट्रीय महामार्ग 548 सी म्हणून मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी म्हसवड ते टेंभुर्णी या मार्गाचे काम सुरु असून यामध्ये संगम व शेवरे येथे शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यामुळे काम बंद असल्याने आ.बबनदादा शिंदे यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडली.
अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले की, सद्यस्थितीत टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी ते कुसळंब या मार्गाचे टेंडर प्रक्रिया झालेली आहे. माढा तालुक्यातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर 5 साखर कारखाने असून टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी या ठिकाणी एम.आय.डी.सी. कार्यान्वित झालेली आहे. साखर कारखाने हंगाम सुरु झाल्यानंतर हंगामात हजारो वाहने,बैलगाडी यांची वाहतूक असल्याने 4 ते 5 महिने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची तासनतास कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सदरचा टेंभुर्णी ते बार्शी कुसळंब हा भाग रस्ता चारपदरी करणे गरजेचे आहे. माढा, करमाळा, बार्शी,विधानसभा मतदारसंघातून जात असून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणारा महत्वाचा राष्ट्रीय मार्ग आहे. परंतू या महामार्गावरील अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनांची तसेच प्रवाशांची संख्या वाढलेली आहे
त्यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत चाललेले आहे.
संगम ते शेवरे तसेच अन्य भागात काम राहिलेले आहे या रस्त्याच्या राहिलेल्या कामासाठी व भूसंपादनासाठी राज्यशासनाने 13 कोटी 20 लाख रुपये निधीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवलेला असून माहे मे,2022 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल अशी माहीती राज्यमंत्री ना.दत्तमामा भरणे यांनी दिली. या चर्चेमध्ये आ.बबनराव शिंदे आ.संजयमामा शिंदे लातूरचे आ.अभिमन्यु पवार यांनी सहभाग घेतला.
*चौकट-*
टेंभुर्णी ते एम.आय.डी.सी. 700 मीटर रस्त्याचे दरमान्य होणारी वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी PWD या विभागामार्फत लवकर रस्त्याची सुधारणा करण्यात यावी तसेच टेम्भूर्णी कुर्डुवाडी ते बार्शी दरम्यान जागा आहे तेथील काम सुरु करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.दत्तामामा भरणे यांनी दिली असल्याचे आ.संजयमामा शिंदे यांनी सांगितले.
*चौकट-*
म्हसवड-अकलुज-टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-कुसलंब-कळंब या राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांनी लातूर येथील रस्ते लोकार्पण कार्यक्रमात सदर रस्त्याचे चारपदरीकरण करणेबाबत घोषणा केलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक बाबींची पुर्तता करून हा मार्ग राज्य शासनाकडून नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे वर्ग करून प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे पाठवावा या मार्गावरील अवजड वाहन,प्रवाशी वाहने ग्रामीण भागातील नागरीकांची सोय होण्यास मदत होणार असल्याने टेंभुर्णी ते कुसळंब हा मार्ग चारपदरी झाल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा