Breaking

रविवार, ६ मार्च, २०२२

बहुजन रयत परिषदेची जिल्हा आढावा बैठक संपन्न, तळागाळातील बहुजनांना पाठबळ देण्याचे काम-ईश्वर क्षीरसागर यांचे प्रतिपादन*



*बहुजन रयत परिषदेची जिल्हा आढावा बैठक संपन्न, तळागाळातील बहुजनांना पाठबळ देण्याचे काम-ईश्वर क्षीरसागर यांचे प्रतिपादन*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली,मात्र बहुजन समाज आज ही मागे आहे, ही  संघटना बहुजनांची आहे, यात 59 जाती - जमाती आहेत त्यांचा विचार करण्याची ही संघटना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्थापन केलेली आहे, तळागाळातील बहुजनांना पाठबळ देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जात असल्याचे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर यांनी केले, शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच बहुजन रयत परिषद (महाराष्ट्र राज्य) जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री ईश्वर क्षीरसागर बोलत होते, यावेळी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ना,म, साठे नगर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, सरोजा क्षीरसागर, उपाध्यक्ष भगवान गोरखे, सतीश थोरात, सत्यवान नवगिरे,गणेश ढोबळे, प्रवीण वाघमार, सागर सकट, भगवान मिसाळ, चंद्रकांत कांबळे, अजय कांबळे, अनिल शिंदे, विजय वडागळे, संतोष बानाईत, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, ईश्वर क्षीरसागर पुढे म्हणाले की फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर  चालणारी आमची संघटना आहे, बाबासाहेबांच्या घटनेनुसार अधिकार प्राप्त करायचे आहेत, हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. बहुजन समाजात शिक्षणाचा खूप मोठा अभाव आहे, त्यामुळे समाज मागे पडला आहे, समाजाच्या कल्याणासाठी संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करीत आहोत, समाजाचा विकास हाच आमचा मूळ उद्देश आहे,मातंग समाजाची अवस्था आजही दयनीय आहे, योजना अनेक आहेत मात्र शिक्षणाच्या अभावामुळे तिथंपर्यंत पोहोचता येत नाही असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा