*राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेऊन सामंजस्याने वाद मिटवून घेणेबाबत जनतेस आवाहन- मा, न्यायाधीश अवघडे*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
मा .राष्टीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या निर्देशानुसार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी तालुका विधी सेवा समिती तुळजापूर यांचे वतीने दिवाणी न्यायालय क. स्तर, तुळजापूर येथे राष्टीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले असून या लोकअदालतीचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेवून तडजोडपात्र प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवून घेणेचे
आवाहन येथील तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश मा. श्री. वि. आ. अवघडे यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मा. राष्टीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि मा. महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडपात्र दिवाणी प्रकरणे, दावा दाखलपुर्व प्रकरणे, बँकेचे कर्ज प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे तसेच ग्रामपंचायत, नगर परिषद व महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ तुळजापूर या कार्यालयाची थकबाकीचे प्रकरणे आणि घरगुती कौटूंबिक वाद, पोटगीचे प्रकरणे तसेच तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची प्रकरणे हि सामोपचाराने आपआपसात
तडजोड करणेसाठी दिनांक १२ मार्च, २०२२ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर, तुळजापूर या ठिकाणी सकाळी ठिक १० वाजता लोकअदालतीचे आयोजन करणेत आलेले आहे.
तरी सदर लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने प्रकरणे मिटवून घेण्यासाठी पक्षकारांनी पुढे येण्याचे आवाहन अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश श्री. वि.आ. अवघडे यांनी केले
आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा