खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हातणी येथे कार्यकर्त्यांचा स्नेहसंवाद मेळावा संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : लोहा तालुक्यातील हातणी येथे दि.५ रोजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात उमरा जि प सर्कल मधील प्रमुख भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कौटुंबिक स्नेह संवाद मेळावा संपन्न झाला.
या संवाद मेळाव्यात पक्षबांधणी सह आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आदी बाबीवर चर्चा करण्यात आली
यावेळी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कौटुंबिक स्नेहसंवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर,लोहा पं.स.समिती सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, उपसभापती नरेंद्र गायकवाड, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, सचिन पाटील चिखलीकर, माजी जि.प.सदस्य गणेशराव पाटील सावळे, उमरा जि.प.सदस्य प्रतिनिधी सुभाषराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य हौसाजी कांबळे, भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी गणेशराव उबाळे, माजी सभापती शंकरराव पाटील ढगे, केरबा पाटील कापसीकर, नागोराव पाटील सिरसाट,गोविंदराव शिंदे, आंचोलीचे माजी सरपंच प्रभाकरराव पाटील मोरे, तुकाराम पाटील हतणीकर,शिवराज जोमेगावकर, बाळू पाटील हातणीकर काशिनाथ पाटील मारतळेकर,सचिन पाटील सिरसाट,भगवान पाटील, सोपान पाटील, बळी पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा