Breaking

मंगळवार, १ मार्च, २०२२

डी.पी. वरील 50 हजार रुपये थकित बाकी भरा व विज कनेक्शन जोडून घ्या.. आ. बबनदादा शिंदे...किंवा 35-65 योजनेचा लाभ घ्या..


डी.पी. वरील 50 हजार रुपये थकित बाकी भरा व विज कनेक्शन जोडून घ्या...


   .आमदार बबनदादा शिंदे.किंवा 35-65 योजनेचा लाभ घ्या..


बेंबळे।प्रतीनीधी।   AJ 24 Taas News Maharashtra        


       
           शेतकरी आपल्याकडील थकित वीज बिल बाकी भरण्यासाठी वीज मंडळाच्या ३५%-६५% या सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा किंवा डीपी वरील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ५० हजार रुपये थकबाकी भरावी व संबंधित अधिकाऱ्याला कनेक्शन जोडून देण्यासंबंधी विनंती करावी, अडचण आल्यास मी सहकार्य करेन व डीपी कनेक्शन जोडून देण्यास सांगेन असे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी बेंबळे येथे 'गावभेट दौरा' याप्रसंगी केले आहे. यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विष्णुपंत हुंबे, माजी सरपंच कैलास भोसले, संभाजी चोरमल, नामदेव भोजने ,नामदेव कांबळे, माणिक पाटील, हनुमंत लोंढे आदी मान्यवरांच्या सह युवक व शेतकरी असे शेकडो नागरिक उपस्थित होते. आमदार बबनदादा शिंदे यांचे गावात उत्साहाने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळेस आमदार शिंदे यांनी बेंबळे भागातील वीज समस्या, पाणी, उसतोडणी आदी बाबींचा ऊहापोह केला. विजेच्या समस्येबद्दल व कनेक्शन तोडणी बाबत आमदार शिंदे म्हणाले की वीज मंडळाकडे पैशाची कमतरता आहे त्यामुळे वसुली शिवाय त्यांना पर्याय नाही. गावासाठी त्यांनी शेतकऱ्यांना थकीत बाकी पैकी 35 टक्के रक्कम भरण्याचे व 65 टक्के रक्कमेवर सवलत देण्याचे धोरण आखले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या सवलतीचा फायदा घ्यावा.  उन्हाळ्यामध्ये सध्या पिकांना जास्त पाण्याची नितांत गरज आहे, यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या डीपीवरील थकित विजबिला पैकी एकुण 50 हजार रुपये वीज मंडळाकडे एकत्रितपणे भरावे व डीपी जोडून देण्यास विनंती करावी ,अडचण आल्यास मी सहकार्य करतो असेही दादांनी आवर्जून सांगितले. उसाच्या बाबतीत आमदार शिंदे म्हणाले की या बेंबळे भागातीला हजारो एकर उस कारखान्यात गळीतास येतो परंतुअद्याप या भागातील बराच ऊस शिल्लक आहे . या वर्षी प्रति एकरी उसाचे वजन जास्त भरल्यामुळे त्याचा गाळपवर परिणाम झालेला आहे पण मार्चअखेर या भागातील ऊस शिल्लक राहणार नाही याची मी हमी देतो.

 चौकट....


 शेतकऱ्यांच्या मुलांनी धंदा व्यवसायात यावे...... आमदार बबनदादा शिंदे यांचे हस्ते संभाजी चोरमल यांच्या जनरल स्टोअरचे तर कैलास भोजने यांच्या कापड दुकानाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी दादांनी दोघांचेही कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीवर अवलंबून न राहता उद्योग व्यवसाय करणे काळाची गरज आहे कारण आता नोकऱ्या तर कुठे उपलब्ध होत नाहीत हे आता ओळखले पाहिजे असे प्रतिपादन दादांनी या प्रसंगी केले.

 राष्ट्रवादीकाँग्रेस मधे प्रवेश.......
 या कार्यक्रमाच्या वेळी प्राध्यापक संतोष शिंदे, नामदेव भोजने, हनुमंत लोंढे व इतर अनेक मान्यवर कार्यकर्त्यांसह युवकांनी भारतीय जनता पक्षा मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ,आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. सर्वांनी गावच्या विकासासाठी एकोप्याने कार्य करत रहा ,निधी कमी पडू देणार नाही, माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील असे आ.बबन दादांनी यावेळी  सांगितले.
              लाँकडाऊन मुळे दीड ते दोन वर्षाच्या कालावधीनंतर आमदार बबनदादा शिंदे बेंबळे येथे आले होते ,त्यामुळे उपस्थितांच्या मधून उत्साहदिसून येत होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक संतोष शिंदे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा