*आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वतीने तुळजापूर आगरातील गरजु चालक व वाहक यांना किराणा किट वाटप.*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
गेल्या अनेक महिन्यापासून एस टी महामंडळाच्या कर्मचारी बांधवांचा विलीनीकरणासाठी लढा सुरू आहे, अनेक कर्मचारी बांधवांनी या लढ्यात दुर्दैवाने आपला जीवन प्रवास संपवला, त्या पैकी काही दिवसांपूर्वी तुळजापूर आगारातील स्व. हनुमंत चंद्रकांत आकोसकर यांनी जीवन ज्योती विझवली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व प्रमुख उपस्थितीतांनी श्रध्दांजली वाहिली, त्यांनतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने देण्यात आलेल्या १०० किराणा किट येथील गरजूंना वाटप करण्यात आल्या, आम्ही आपल्या दुखवट्यात सहभागी आहोत व ही मदत नसुन माझे कर्तव्यच आहे असे या प्रसंगी दुरध्वनी वरून कर्मचारी बांधवांना बोलताना आमदार राणादादा यांनी सांगितले,
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, नगरसेवक विजय कंदले, औदुंबर कदम, किशोर साठे, विजय शिंगाडे,सुहास साळुंके, नरेश अमृतराव, राजेश शिंदे, प्रकाश मगर,विठ्ठल सोनवणे, तसेच युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले,राजेश्वर कदम, रोहित पाटील, इंद्रजित साळुंके, दिनेश बागल, बाळासाहेब भोसले, सचिन रसाळ, राम चोपदार, प्रसाद पानपुडे, सागर पारडे, निलेश नाईकवाडी, श्री गवळी,दयानंद शिंदे हे उपस्थित होते.
एस टी बांधवांपेेैकी नागनाथ मसुते, एन एस खांडेकर,सुरेंद्र सगरे, अमोल सरडे ,व्हि व्हि कांबळे,एस ए डोळस, राजा जाधव , किशोर पवार, अमित जाधव यां प्रमुखांनी किराणा किट वाटप साठी नियोजन केले,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा