Breaking

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांची मोठी कारवाई, गुटखा साहित्य तब्बल ०१ कोटी ०६, लाख २३ हजार रुपयाचा मुद्देमाल केला पोलिसांनी जप्त,दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात*


*तुळजापूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांची मोठी कारवाई, गुटखा साहित्य तब्बल ०१ कोटी ०६, लाख २३ हजार रुपयाचा मुद्देमाल केला पोलिसांनी जप्त,दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात*




प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांच्या पथकाने सुतावरून स्वर्ग गाठून पुन्हा बेधडक कारवाई केली आहे .उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी कारवाही तुळजापूर पोलिसांनी व स्थानिक गुन्हा शाखा उस्मानाबाद यांनी केली आहे .या कारवाईमध्ये तब्बल एक कोटी सहा लाख तेवीस हजार रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी अमली पदार्थ स्वतःजवळ बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे .
          याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रात्री ११:३०, वाजण्याच्या सुमारास तुळजापूर ते उस्मानाबाद रोड वरील उड्डाणपुला खालून स्वतःच्या फायद्यासाठी अमली पदार्थ स्वतःजवळ बाळगून वाहतूक करत असल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना व स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांच्या पथकास लागली .त्यानुसार मा अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशावरून व  उपविभागीय पोलिस अधिकारी सई - भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी  मिळालेल्या माहितीनुसार वरील ठिकाणी सापळा लावला असता आरोपीने त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड वाहन क्रमांक KA32C3731 मध्ये सुगंधित सुपारी 55 किलो चे पांढरे पोते संख्या 298 त्याची किंमत रुपये 81 लाख 95 हजार रुपये तसेच गुटका बनवण्यासाठी लागणारी पावडर चाळीस किलो चे पांढरे पोते संख्या 119 त्याची किंमत रुपये 14 लाख 28 हजार असे एकूण 96 लाख 23 हजार व अशोक लेलँड कंपनीचा वाहन क्रमाक KA32C3731ज्याची अंदाजे किंमत 10लाख रुपये असे एकूण 01कोटी 6 लाख 23 हजार रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला .
              सदर कारवाई तुळजापूर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे .तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, उपनिरीक्षक राहुल रोटे,पोलीस नाईक सचिन राऊत,पोलीस नाईक गणेश माळी,पोलीस कॉन्स्टेबल अजितकुमार सोनवणे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोपळे,तसेच स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद या पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार ,पोलीस नाईक 1166 सय्यद,पोलीस नाईक1559 चव्हाण या संयुक्त पथकाने बेधडक कारवाई केली .
                    याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन श्री प्रमोद कुमार काकडे यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे आरोपी ( ट्रक ड्रायव्हर ) भिमशाह गुरुशांतअप्पा धोगी वय 26 वर्षे रा लिंगदल्ली,किण्णी ता .बसवकल्याण जि बिदर व (ट्रक किन्नर ) महमंद अलताफ बाबुमिया सवार वय 38 वर्ष रा.दुबलगुडी ता.
हुमनाबाद जि.बिदर या दोघांवर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे भा द वि 277,273,188,328, सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 सह इतर पोट कलम तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर कांबळे हे करत आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा