Breaking

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

कन्हेरगांव येथील वीज पुरवठा आठ तास करा...अन्यथा तिव्र आंदोलन करणार - काशीद वस्ती येथील शेतकऱ्यांनी दिला इशारा .



कन्हेरगांव येथील वीज पुरवठा आठ तास करा...


अन्यथा तिव्र आंदोलन करणार - काशीद वस्ती येथील शेतकऱ्यांनी दिला इशारा . 


कन्हेरगांव दि प्रतिनिधी 

 कन्हेरगांव तालुका माढा येथील शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारी ते 28  पर्यंत वीज बिलाची संपूर्ण चालू थकीत रक्कम भरणा केलेली आहे. तरीसुद्धा या सर्व शेतकऱ्यांना महावितरण फक्त एकच तास वीजपुरवठा करीत आहे. सध्या चालू असलेला 1 तास वीज पुरवठा आमच्यावर अन्यायकारक आहे.आमची पिके जळू लागली आहेत , तरी ज्या शेतकऱ्यांनी चालू थकित वीज बिलाची रक्कम भरली आहे ,अशा सर्व शेतकऱ्यांना 8 तासाचा वीज पुरवठा चालू करावा  , अन्यथा तिव्र आंदोलन करणार असल्याचे बापूसाहेब काशीद यांनी महावितरण चे सहाय्यक अभियंता विकासकुमार रस्तोगी यांच्याकडे निवेदनाद्वारे इशारा दिला आहे .
       याबाबत सविस्तर माहिती अशी की , कन्हेरगांव येथील बर्याच शेतकऱ्यांनी चालू वीज बिलाची रक्कम भरली असतानासुद्धा त्यांना फक्त एकच तास वीजपुरवठा दिला जातो आहे .  त्यामुळे  विजपुरवठा चालू न केल्यास आम्ही शेतकरी ग्राहक उपोषणास बसणार आहोत ,असे बापुराव काशिद यांनी सांगितले आहे . यावेळी बापूसाहेब काशीद , नागन्नाथ काशिद,दत्तात्रय कदम,गणेश गोंदिल,सोमनाथ खोचरे,दत्तात्रय 
भरगंडे,उत्तम भरगंडे,बंडू भरगंडे,भागवत भरगंडे , विठ्ठल केदार , सागर काशीद आदी शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा