# भुयारी गटारचे काम अपुर्ण असताना
रस्ते करायचा प्रयत्न नागरिकांनी उधळला #
कुर्डूवाडी शहरात भुयारी गटार योजना सफशेल पने अयशस्वी झालेली आहे . या भुयारी गटारीचा टेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला असता रस्त्याच्या मधोमध असलेल्या चेंबर मधून पाणी बाहेर येते आहे . याच ताज उदाहरण कुर्डूवाडी नगरपालिके जवळील प्रांजल हॉटेल समोर पाईप चाेकप झाला . यामुळे झालेल्या भुयारी गटार याेजनेचा पाईप पूर्ण पुणे उकरून काढून पुन्हा नव्याने बसवावा लागला .
## अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नगरसेवक भुयारी गटाराचे काम व्हायच्या आधीच रस्त्याची कामे करा म्हनत आहेत . भुयारी गटाराचे प्रॉपर्टी चेंबर आणखीन अनेक ठिकाणी जाेडलेले नाहीत अनेक ठिकाणी पाणी वाहत नाही . शासकीय नियमा नुसार भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्या नंतर तीन महिने त्याचे टेस्टिंग करायची आहे . या नंतर रस्त्याची कामे करता येणार आहेत . नगर विकास विभागाचे मुख्य सचिव यांनी या बाबतचा स्पष्ट आदेश दिलेला आहे .
## नगरपालिकेच्या प्रशासक उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना कुर्डूवाडी शहरातील विविध पक्षाचे पाच शहर अध्यक्ष यांनी नुकतेच निवेदन दिले आहे . त्यात मागणी केली आहे की मुख्य सचिवाच्या आदेशा नुसार भुयारी गटाराचे काम पूर्ण झाल्या नंतर रस्त्याची कामे करण्यात यावीत . नगरपालिकेने भुयारी गटार योजना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अद्याप दिलेले नसताना रस्ता करण्याचा डाव सत्ताधारी नेते मंडळींनी आखलेला हाेता .
## नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी गवळी , अतुल फरतडे , राजाभाऊ शेंबडे,बंडू टोणपे,योगेश देशपांडे,सुहास साळुंखे,बालाजी लुकड,आण्णा होनमाने , कुर्डूवाडी कर सर्वानी मिळून पंजाब तालिम शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तेथे रस्ता करण्या साठी आलेल्या ठेकेदाराला ठणकावून सांगितले की आधी भुयारी गटारांची कामे पूर्ण करा मगच रस्ता करायला या . अन्यथा या परिसरात राहणारे स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्ते यासाठी विरोध करनार आहेत . तेथील नागरिकांचे राैद्र रूप पाहून रस्ता करायला आलेले त्यांचे बगलबच्चे गुपचूप निघून गेले . आधी गटारीचे काम पूर्ण करने त्याची टेस्टिंग करने नंतरच खुशाल रस्ते करा याला आमचा काहीही विरोध असणार नाही .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा