*खा. छत्रपती संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पाठींबा*
खासदार संभाजी राजे यांचे दि. 26/02/2022 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु असून या संदर्भामध्ये खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज संभाजी राजे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलत्कार प्रकरणपासून सकल मराठा समाजाने एकत्र येत संपूर्ण महाराष्ट्र भर अंदोलने, निषेध मोर्चे तसेच मुक मोर्चे काढून संबंधीत प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व मराठा समाजास आरक्षणाची मागणी केली होती. तात्कालीन सरकारने या मागणीच्या अनुषंगाने समाजिक व आर्थिक आरक्षण जाहीर केले होते. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द ठरवण्यात आले. सबब संपूर्ण मराठा समाज या निर्णयाने अस्वस्थ झाला असून सकल मराठा समाजाच्या आरक्षण, मराठा समाजातील विद्यार्थ्यानसाठी सारथी या संस्थे मार्फत शिष्यवृत्ती व आण्णा साहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या संदर्भामध्ये उपोषण सुरु केली आहे. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी खा. संभाजी राजे यांच्या प्रकृतीची चौकशी करुन या उपोषणास जाहीर पाठींबा दर्शविला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा