*भिमानगर येथील सेतू चालकाच्या मनमानी कारभारामुळे कोंढार भागातील नागरिक त्रस्त*
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील कोंढार भागातील सेतू चालक त्यांना नेमून दिलेल्या गावात सेतू न चालविता मनमानी करून भिमानगर चौकात सेतू चालवीत असल्याने नागरिकांची मात्र गावात सेतू मंजूर असून अडचण होत आहे.तरीही महसूल प्रशासन याकडे जाणून-बुजून डोळे झाक करीत आहे.
शासनाचे अलीकडे सर्व व्यवहार तसेच दैनंदिन विविध कामे ऑनलाईनच करावी लागत आहेत.यामुळे शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सेतू कार्यालये रीतसर सुरू केलेली आहेत.याप्रमाणे अनेक ठिकाणी सेतू कार्यालये सुरू ही आहेत.मात्र काही सेतुचालक प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी सेतू न चालविता ज्या ठिकाणी लोकांची आवक जावक जास्त आहे अशा ठिकाणी सेतू चालवून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहे.तसेच याकडे नियंत्रण ठेवण्यासाठी महसुली अधिकारी आहेत.मात्र हे अधिकारी ही चिरीमिरीच्या आशेने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचेच चित्र दिसत आहे.यामुळे कोंढार भागातील नागरिकांना नाहक १५-२० किमी अंतर जावे लागत आहे.यामुळे लोकांचा वेळ व पैसा खर्च होत असल्याने गैरसोय झाल्याने नागरिकांची अवस्था तोंड दाबून बुक्याचा मार सहन करण्यासारखी झाली आहे.यामुळे शासन नागरिकांशी बांधिलकी पाळणार का?असा खरा प्रश्न आहे.
ज्या ठिकाणी सेतू सुरू आहेत.त्याच ठिकाणी रांझणी मंडलचे मंडल कार्यालय सुरू आहे.नित्य सुरू असलेल्या प्रकाराकडे तेथील अधिकारी डोळसपणे कधी पाहणार याची प्रतिक्षा कोंढार भागातील लोकांना लागून राहिली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा