Breaking

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत स्कॉर्पिओ ला अपघात ९ जखमी



मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत स्कॉर्पिओ ला अपघात ९ जखमी



मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत १३/२/२०२२ रोजी रविवारी पहाटे ५:४० वाजण्याच्या सुमारास एका वळणावर स्कॉर्पिओ वरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला  २५ फूट खोल खड्यात पडली या अपघात  ९ प्रवासी गंभीर जखमी झाले .सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले .
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत चढावाच्या ठिकाणी एका अवघड वळणावर डोंबिवली ते सातारा जाणारी स्कॉर्पिओ क्रमांक एम. एच. ०१ बी एफ - ५४५२ ही रस्त्या कडेला २५ फूट खड्डयात कोसळली या अपघातात- वैभव वसंत कदम वय २५ वर्षे , धीरज वसंत कदम वय २८ वर्ष , कविता धीरज कदम वय २६ वर्षे , विमल वसंत कदम वय ४५ वर्षे, सुनील भागवत कदम वय ३० वर्ष, योगिनी सुनील कदम वय ३६ वर्ष , विराज बाबू कदम वय १० वर्ष ,अन्वी सुनील कदम वय ४ वर्ष , ध्रुवी धीरज कदम वय ०२ वर्ष सर्व राहणार डोंबिवली असे ९ प्रवासी जखमी झाले सर्व जखमींन वर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले .
अपघाताची माहिती  महामार्ग वाहतूक शाखा यांना  मिळताच शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय भोसले आणि पोलीस शिपाई दीपक बल्लाळ यांनी घटना इस्थली धाव घेत सर्व जखमींना रुग्ण वाहिका द्वारे महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी पोहचवले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा