Breaking

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

पोलिसांना दमदाटी तरी एका दिवसात हे 'साहेब' घरी.



पोलिसांना दमदाटी तरी एका दिवसात हे 'साहेब' घरी.


श्रीगोंदा-नितीन रोही

दौंड येथील आंबेडकर चौकात बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दमदाटी व आरेरावी केल्याचा ठपका ठेवत अवधुत राऊत यांच्यावर दौंड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. ३५३, ३३२, ५०२, ५०४ असले गंभीर कलम गुन्हा दाखल करताना टाकण्यात आले. पोलिसांना नगर-पुणे जिल्ह्यातील अनेक बड्या हस्तींनी फोनाफोनी करत हा गुन्हा दाखल होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केला. पण गुन्हा त्या आधीच तडकाफडकी दाखल झाल्याने अवधुत राऊत यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नव्हता.

पण ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी दौंड न्यायालयाने अवधुत राऊत यांची जामिनावर सुटका केली. पोलीस फिर्यादी असताना हा गुन्हा त्यांच्या विरोधात असताना याला गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. त्यात ३५३ च्या गुन्ह्यात तालुक्यातील बडेबडे नेते १०-१५ दिवस आत राहिले आहेत. 
राऊत यांच्या बद्दल हीच शक्यता होती. पण राऊत यांनी एका दिवसात बाहेर येत आपला करिष्मा दाखवला. 

राऊत यांना अटक झाल्यानंतर काहीं लोकांनी या बातमीला रंग देऊन पसरवण्याचे काम केले त्यांना ही जोराची चपराक बसली असल्याचे जाणवत होते. अवधुत राऊत यांचा राजकीय व्यवस्थापनात असलेला हातखंडा अनेकांना जळवणारा आहे त्यामुळे त्यांना तसे विरोधकही लाभले आहेत. पण आपल्या विरोधकांच्या षड्यंत्रांना ते कायम पुरून उरत आले आहेत. त्यात आ. बबनराव पाचपुते वगळता तालुक्यातील सर्वच नेते अवधुत राऊत यांच्यामागे उभे असल्याचे दिसते. त्यात मुंबई तील कायदेतज्ज्ञ निवेदिता पोतदार या साऱ्या प्रकरणात लक्ष ठेऊन असल्याची ही चर्चा होती.

गुन्हा दाखल झाल्यावर मंगळवारी रात्री उशिरा अनेकांनी राऊत यांच्यासाठी दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. बंडूतात्या जगताप, अंकुश शिंदे, विशाल सकट,योगेश चंदन यांनी सर्व सूत्रे हलवल्याचे बोलले जाते. उद्योजक संजय काळे, माऊली पाचपुते, शशिकांत जाधव, प्रताप भोर, प्रताप जाधव, संभाजी जाधव, सचिन पाडळे, पपू शेख, प्रसाद भिवसने, अरुष महाजन यांच्यासह अनेकांनी पोलिस स्टेशन गाठले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा