जिवलग तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू...
राहुल च्या धक्क्याने आजोबांचा मृत्यू...श्रीगोंदा शहरातील घटना..
AJ 24 Taas News Maharastra Network-प्रतिनिधी-श्रीगोंदा-नितीन रोही,
आपल्या मित्राला काष्टी येथे सोडण्यासाठी निघालेल्या मित्रांवर शेंडगेवाडी येथे ट्रॉलीला मागे धडकून झालेल्या भीषण कार अपघातात तिघांवर मृत्यू ओढवला आहे. तर, त्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
आज मध्यरात्री एक ते दीड च्या सुमारास झालेल्या या अपघातात केशव सायकर (वय वर्ष २२) राहणार काष्टी, आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय वर्षे१८) राहणार श्रीगोंदा व राहुल सुरेश आळेकर (वय वर्ष २२) राहणार श्रीगोंदा या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
केशवला काष्टीत सोडण्यासाठी निघालेल्या तिघांच्या गाडीला अनन्या हॉटेल समोर कार चालकाला पुढे असणाऱ्या ट्रॉलीचा अंदाज आला नसल्याने, ट्रॉलीला पाठीमागून कारची जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्या कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.
श्रीगोंदा काष्टी व नगर दौंड या द्रुतगती मार्गामुळे सर्वांनाच प्रवास करण्यास सुलभ झाले आहे. मात्र, सर्रास घडणाऱ्या या दुर्दैवी घटनांमुळे राज्य मार्ग किंवा द्रुतगती मार्ग दोन शहरांना जोडणारे की, व्यक्तीचे आयुष्य संपवणारे..असे वाटू लागले आहे.
चौकट,
राहुल आळेकरचे रात्री अपघाती निधन झाले त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मयत राहुल याचे आजोबा(आईचे वडील)जालिंदर लहानू शिंदे वय ६३घारगाव हे अंत्यविधीसाठी आले. त्यांना नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाला
नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांचे मृत्यू झाल्यामुळे हा धक्कादायक दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
आपल्या नातवाचे अपघाती निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांचे निधन झाल्याची दुर्दैवी दुःखद घटना श्रीगोंदयात आज सकाळी घडली आहे
शहरातील राहुल आळेकर या युवकाचे रात्री अपघाती निधन झाले त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मयत राहुल याचे आजोबा(आईचे वडील)जालिंदर लहानू शिंदे वय ६३रा घारगाव हे आज सकाळी अंत्यविधीसाठी आले असता त्यांना नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाला
नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांचा मृत्यू झाल्याच्या या धक्कादायक दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा