“आफुची अवैध लागवड करणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल”
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
स्थानिक गुन्हे शाखा : नरसिंग देवीदास येताळ, रा. वाशी व विश्वंभर प्रल्हाद पारडे, रा. इंदापुर, ता. वाशी या दोघांनी वाशी शिवारातील गट क्र. अनुक्रमे 543 व 134 मधील आपापल्या शेतात आफु या अंमली वनस्पतीची अवैध लागवड केल्याची विश्वसनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास मिळाली होती. यावर उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम श्री. डंबाळे व स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. शैलेश पवार, पोहेकॉ- ठाकूर, पोना- जाधवर, पोकॉ- सर्जे, आरसेवाड, गोरे यांसह वाशी पो.ठा. चे पोनि- श्री. रामेश्वर खनाळ, पोना- नितीन जाधवर व वाशी पो.ठा. चे कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने दि. 25.02.2022 रोजी 11.50 ते 15.20 वा. दरम्यान नमूद दोन्ही शेतात छापे टाकले. यावेळी येताळ व पारडे यांच्या शेतात आफु या अंमली सद्रष्य वनस्पतीची मुळासकट उपटलेली त्यास हिरवी पाने, बोंडे असलेल्या अशा एकुण 57 पेंढ्या मिळुन आल्या त्या पोलीसांनी जप्त केल्या असता त्यांचे वजन 505 कि.ग्रॅ. इतके आढळले.
यावरुन सपोनि- श्री. शैलेश पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नरसिंग येताळ व विश्वंभर पारडे यांच्याविरुध्द वाशी पो.ठा. येथे अनुक्रमे गुन्हा क्र. 35 व 36/ 2022 हे नार्कोटीक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपीक सबस्टान्स ॲक्ट कलम- 15, 18 नुसार 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा