मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसमध्ये अपघात
3 ठार दोन जखमी – दोन सख्ख्या भावांपैकी एक ठार तर एक गंभीर
महाड : प्रतिनिधी AJ 24 Taas News Maharashtra
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री १२:४५ च्या सुमारास मुंबईकडे जाणारी बलेनो कार आणि बस मध्ये सामोरासमोर धडक होऊन कार मधील चार प्रवाशी ठार झाले तर एक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण एकाच घरातील नातलग असून कणकवली येथून लग्नसोहळा आटोपून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव गावाजवळ मुंबईहुन रत्नागिरी कडे जाणाऱ्या बस क्रमांक एम. एच.- ४८ बी एम ६२९९, वर मुंबई कडे जाणारी बलेनो कार क्रमांक एम. एच.०५ - डी एस ६८६१, ही विरुद्ध दिशेला येऊन जोरात आपटली. या कार मधून पाच प्रवासी प्रवास करत होते. अपघातात कार मधील संदीप सीताराम पाटील - ४० कल्याण, हे जागीच ठार झाले तर साधना निलेश राऊत - ४५ जोगेश्वरी मुंबई, अनिल दत्ताराम राणे - ४५ जोगेश्वरी मुंबई, सुगंधा सीताराम पाटील - ७० हे तीन प्रवासी उपचारा दरम्यान मृत्यू पावले. एकूण या अपघातात कार मधील चार प्रवासी ठार झाले असून कार चालक दीपक सीताराम पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बलेनो कार अपघातातील सर्व रहिवाशी मुंबई येथील असून कणकवली येथे लग्न सोहळ्याला हे सर्वजण गेले होते. यातील बलेनो कार अपघातातील चालक दीपक सीताराम पाटील आणि संदीप सीताराम पाटील हे सख्खे भाऊ असून यातील दीपक हा गंभीर जखमी असून संदीप पाटील हे मयत झाले आहेत. तर सोबत प्रवास करत असलेली मयत महिला हि या दोघांची बहिण असल्याची माहिती नातलगांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा