विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून मयताच्या नातेवाईकांस दोन लाखाचा विमा प्रधान..पती गेल्यानंतर पत्नीस मिळाला मिळाला मोलाचा आधार
बेंबळे येथील ग्रामीण बँकेचा उपक्रम
सिद्धेश्वर शिंदे
बेंबळे (पुढारी वृत्तसेवा) पतीच्या निधनानंतर आभाळ कोसळलेल्या पत्नीस आपण काय करावे काय नाही या विचारात असताना बेंबळे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक ने त्यांना दोन लाखाचा विमा मंजूर करून प्रधान केला. त्यामुळे आपला पती गेल्यानंतर पत्नीला आपण काय आणि कसे करायचे या प्रश्नाचे उत्तर मिळुन गेले..
सविस्तर वृत्त असे की बेंबळे येथील भारत भगवान सुरवसे यांनी गेल्या पाच सहा महिने खाली प्रधानमंत्री सुरक्षा योजना व जीवन ज्योती विमा योजना या अंतर्गत गावातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत आपला विमा घेतला होता .परंतु त्यांचा दुर्देवाने आकस्मित मृत्यू झाला मात्र त्यांच्या योग्य निर्णयामुळे कुटुंबाला आधार देण्याचे काम विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांनी केले
बेंबळे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा अधिकारी पी एन देशपांडे यांनी सदर मयत भारत भगवान सुरवसे यांच्या पत्नी शारदा भारत सुरवसे यांना दोन लाख रुपये चा विमा रक्कम देण्याचा निर्णय घेतला.
बेंबळे गावातील सरपंच विजय पवार माजी सरपंच कैलास भोसले यांच्या हस्ते शारदा भारत सूर्यवसे यांना दोन लाख रुपयांचा चेक देण्यात आला यावेळी सहाय्यक प्रबंधक विक्रम कदम बँक मित्र संतोष पवळ. गणेश हुलगे बँक कर्मचारी अमित कुलकर्णी ,गौरी जाधव, दीपाली घाडगे, नागनाथ ताकतोडे हे उपस्थित होते.
कोट .
प्रदानमंत्री सुरक्षा योजना व जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत कमी पैशांमध्ये विमा योजना उपलब्ध असून 330 रुपयांमध्ये दोन लाखाचा विमा तर बारा रुपयांमध्ये दोन लाखाचा विमा योजना चालू आहे यामध्ये अपघाती 200000 तर आकस्मित 200000 असे चार लाखाचा विमा केवळ 342 रूपायांमध्ये उपलब्ध असून याचा लाभ सर्व बँकेच्या खातेदारांनी घ्यावा असे आव्हान बँकेचे शाखाधिकारी पी एन देशपांडे यानी केले.
पी एन देशपांडे.. शाखा अधिकारी
बेंबळे विदर्भ कोकण ग्रामीण बँक


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा