Breaking

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर येथे शिवजन्मोउत्सव निमित्त शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले,यात ६५, रक्तदात्यांनी केले रक्तदान*



*तुळजापूर येथे शिवजन्मोउत्सव निमित्त शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले,यात ६५, रक्तदात्यांनी केले रक्तदान*


  आज दिनांक,२१ फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथे शिवजन्मोत्सव निमित्त शिवबाराजे प्रतिष्ठान च्या वतीने, रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी चे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ, सई भोरे पाटील, व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या हस्ते,श्री तुळजाभवानी मातेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,व रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला, तसेच मोफत आरोग्य व नेत्र (डोळे ) तपासणी करण्यात आली,


तसेच प्रत्येक रक्तदात्यास शिवबराजे प्रतिष्ठानच्या वतीने हेल्मेट व कुकर भेट देण्यात आली. या रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले,यावेळी शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,अर्जुन आप्पा साळुंके,विकी वाघमारे,चेतन शिंदे, नितीन जट्टे,आलोक शिंदे,सोनू गवळी,कृष्णा गिरी,सुमित छत्रे,युवराज वाघमारे,लल्ला शिंदे,राम जाधव,वैभव भगरे, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांचे सहकार्य लाभले.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा